BIG BREAKING NEWS...

समाजसेवक मनोज देसले गोरगरिबांचे आधारस्तंभ ; मनोज देसले यांच्या प्रत्येक विकास कार्याच्या सावलीत आमदार किसनराव कथोरे यांचीच छबी...

 (दि.05,POL - कुणाल शेलार,मुरबाड)

विकास कसा करावा आणि समाजसेवक कसा असावा,आपल्या वार्डापासून तालुक्याच्या गावखेडेपर्यंत जनसामान्यांना मदत करताना ज्यांनी कधीही स्वार्थ पाहिला नाही अशा गोरगरिब दुर्बल घटकांतील हक्काचे व्यक्तीमत्व हिरा व आधारसावली म्हणून समाजसेवक तथा देवा ग्रुप फाऊंडेशनचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज देसले यांचे नाव समोर येते.


गोरगरिबांचे डोळयातील अश्रु डोळयात न आणण्यासाठी व सदैव त्यांच्या चेर्यावर आनंदी हसरा चेहरा कायम असावा अशी माणुसकीची झरी जपणारे मनोज देसले आज गोरगरिबांच्या गळयातील तार्इत झाले असून त्यांच्या कार्याची प्रशंसा मात्र सर्वत्र होतांना दिसत आहे.मुरबाड शहरात कमी कालावधीतच सर्वाधिक विकासकामे करणारे प्रथम लोकप्रतिनिधी झलक म्हणून ओळख निर्माण करणारे मनोज देसले यांच्याकडे पाहिले जाते.


त्यांच्या युवा कालावधीतच निराधार,महिलांना हाताला काम मिळवून देण्यासाठी त्यांनी शिलार्इ मशिनी वाटप केल्या,दुजाकी स्वारांना मोफत हेल्मेटचे वाटप केले,विद्दयार्थ्यांना शालेय साहित्य गणवेश वाटप,सण उत्सव आपलेच कुटूंब असल्याचे माणून गरिबांच्या घरात साजरी करणे,मदतीसाठी सर्वस्वी जबाबदारी घेत ती पूर्ण करणे यांसह असंख्य सामाजिक,शैक्षणिक,आरोग्य,क्रिडा क्षेत्रासह विविध क्षेत्रात त्यांचे योगदान नेहमी चर्चेतच राहिले आहे.विकास कामे करतांना स्वतः जातीने लक्ष घालून नैसर्गिक आपत्तीसह इतर आलेल्या प्रत्येक संकटात सर्वांच्या पहिले मदतीसाठी तत्पर असल्याचे जनताच सांगून जाते.


मागे एका सर्पदंश बालकाला वाचविण्यासाठी श्री.देसले यांनी जी ताकद लावली त्या ताकदेने त्या बालकाचा जीव वाचल्याने डॉक्टरांसह मनोज देसले म्हणजे देवदूतच ठरले असल्याचे नातेवार्इकांनी सांगितले होते.वयोवृध्दांना मनोज देसले आधारस्तंभ असून त्यांच्या झोपडीत जाऊन एक कौटूंबिक सदस्य म्हणून जेवन करतांना दिसले आहे.मनोज देसले यांना गोरगरिबांकडून मायेचा आधार आणि आशिर्वाद मिळत असल्याने जगाचे सुख याच्यातच असल्याचे मनोज देसले यांनी मागे एका कार्यक्रमाचे औचित्य साधत म्हंटले आहे.


ही कार्यपध्दत एका नवतरूण युवकांमध्ये असल्याने त्यांच्याकडे पाहून इतर नवयुवक तरूण यांना सामाजिकतेची प्रेरणा मिळते हे सुध्दा तितकेच खरे आहे.मनोज देसले यांच्या यशामागे आमदार किसनराव कथोरे यांचे श्रेय मोलाचे लाभत असून त्यांच्या प्रत्येक समाजकार्यात खरी ताकद ही आमदार किसनराव कथोरे यांची आहे,


त्यामुळे आज गोरगरिबांच्या जीवनात आधारस्तंभ म्हणून जिथं मनोज देसले यांचे नाव आहे तिथं आमदार किसनराव कथोरे हेच उभे आहेत असे म्हंटले जाते.


मनोज देसले यांच्या प्रत्येक विकास कार्याच्या सावलीत आमदार किसनराव कथोरे यांचीच छबी दिसत असल्याचे येथिल जनता सांगून जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post