BIG BREAKING NEWS...

एक आदर्श प्रशासक मनोज म्हसे (मुरबाड नगरपंचायत मुख्याधिकारी)

 

(POL,कुणाल शेलार - मुरबाड)

मुरबाड शहराच्या विकासामध्ये ज्यांच्या पारदर्शक तसेच  कर्तव्यदक्ष,कणखर असे प्रशासक भूमिकेतुन ओळखले जाते असे मुरबाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज म्हसे यांच्या कार्याची स्तुत्य प्रशंसा नागरिकांमध्ये होत आहे.मुख्याधिकारी मनोज म्हसे यांच्या आदर्श व्यक्तीमत्वाच्या झालेल्या कार्यशैलीत विकासाच्या दृष्टिने महत्वपूर्ण योगदान म्हणून असे सिंहाचा वाटा ठरला आहे.विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यामध्ये मुरबाड नगरपंचायत ही अग्रेसर असल्याने यामध्ये मुख्याधिकारी मनोज म्हसे यांच्या विशेष मेहनतीचे श्रेय आहेत.मुरबाड नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात नागरिकांच्या विविध समस्या,तक्रारीवर आवर्जुन लक्ष वेधून त्यावर निरासरण करण्यासाठी मनोज म्हसे हे प्रभावशाली म्हणून ठरत असून पाणी टंचार्इचा असलेला प्रश्न मार्गी लावण्यात त्यांचाही हातखंडा राहिला आहे.पावसाळयात पुरपरिस्थितीत स्वतः पाण्यात उतरून ती पुरस्थिती आटोक्यात आणण्यासाठी समासजेवक तसेच नगरसेवक यांच्यासोबत एक कर्तव्यदक्षाची भूमिका त्यांनी जबाबदारीसोबत माणूसकी झरी जपत यशस्वीपणे पार पाडली आहे त्या बलाढय संकटावेळी त्यांच्या उपस्थितीची झलक सर्वांनी जवळून पाहिली असल्याने नागरिकांनी त्यांचे कौतूक करून अभिनंदनही केले होते.मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी केलेल्या विविध कार्याची स्तुती जितकी करावी तितकी कमी असून त्यांच्या कार्यावर मिडीया माध्यमातून त्यांचे कार्याबाबत माध्यमांनी त्यांची भूमिका मांडली होती.मनोज म्हसे हे आजरोजीपर्यंत होऊन गेलेल्या सर्व मुख्याधिकारी यांच्यापेक्षा वेगळे असून आलेल्या प्रत्येक सामान्यातील सामान्य व्यक्तींना आदर सन्मानाची वागवणूक देत असल्याने त्यांचे शब्दसुमनानी येथिल नागरिक कौतुक करित असून एक आदर्श प्रशासक म्हणून त्यांच्यामध्ये पाहिले जात असल्याचे येथिल नागरिकांनी म्हंटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post