(POL,कुणाल शेलार - मुरबाड)
गेल्या अनेक वर्षा
पासून सामाजिक,
धार्मिक क्षेत्रासह राजकारणात प्रभुत्व पायंडा असलेले उद्योजक तथा मुरबाड
नगरपंचायतीचे मा. नगराध्यक्ष मोहन सासे यांच्या कार्याचा लेखाजोखा
सर्वांनाच ज्ञात असून त्यांचा सर्व समाज बांधवाना नेहमी मदतीचा हात मिळाला आहे.
त्यांचा स्वभाव हा माणसातील माणुसकी जागृत ठेवणारा राहिलेला असून अनेकांच्या
संकटावेळी त्यांची साथ मिळाली आहे. कार्यक्षमता पलीकडे जाऊन त्यांनी
नैतिकता संपादित केली आहे. त्यांच्या प्रत्येक यशस्वी शिखरात
आमदार किसनराव कथोरे यांचे योगदानही अमूल्य ठरले असून विकास कामात साहेबांचे कोणी हात
धरू शकणार नाही, कोकणाचे आधारस्तंभ म्हणून साहेबांकडे पाहिले
जात असून त्यांच्या मागे लाखो जनसामन्यांचा आशीर्वाद आहे.
आमदार किसनराव कथोरे साहेब
माझ्या जीवनाचे श्वास असून ते माझे सेनापती आहेत व मी त्यांचा
सैनिक आहे त्यामुळे माझ्या साहेबांच्या सोबत अखेरच्या श्वासासोबत
सैनिक म्हणून असणार असल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.माणसाला त्याचे कर्तृत्व मोठे करते त्यामुळे मनातील जिद्द बाळगून सैनिक झाल्यास
सेनापती यांचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहतो असाच आशीर्वाद मला माझे सेनापती आमदार किसनराव
कथोरे साहेब यांच्या कडून मिळाला असून माझे सर्वेसर्वा एकच विकासाचे वादळ असलेले श्री.
कथोरे साहेबच आहेत असे मा. नगराध्यक्ष मोहन सासे
यांनी आपले विचार प्रकट करताना म्हंटले आहे.
मुरबाड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष
असताना मोहन सासे यांनी मुरबाड शहराचा विकास करून कायाकल्प केला आहे.त्यांचा नेहमी उत्साही हसरा चेहरा राहिला असून प्रत्येकाच्या दुःखात त्यांनी
कौटुंबिक आधार दिला असून आमदार किसनराव कथोरे यांनाही श्री.सासे
यांच्या विषयी एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून अभिमान वाटत आहे.आमदार
श्री.कथोरे साहेबांचा कार्यकर्ता व कट्टर समर्थक असल्याने तीच
आमची माऊली आणि तीच आमची दिशा असेही आपल्या शब्दात मोहन सासे यांनी म्हंटले आहे.
गेल्या अनेक वर्षात
विविध नागरिकांचे प्रश्न आमदार किसन कथोरे यांनी सोडविले असून विकासाचे पर्व म्हणून त्याच्याकडे पाहिले
जाते.संपूर्ण जिल्हयात साहेबांच्या विकास कार्याची तुलना कोणीही
करू शकत नाही,सर्वप्रथम साहेबांनी कन्यादान परंपरेची सुरूवात
मुरबाड विधानसभेतून सुरू केली असून प्रत्येकांच्या सुखः दुखःत त्यांचा सहवास हा लाभला
आहे.वटवृक्षाप्रमाणे साहेब उभे असून त्यांच्या आशिर्वादामुळे
अनेकांच्या जीवनात परिर्वतन घडले आहे.गाव खेडे पाडयासह पर्यटनाबरोबर धार्मिक स्थळांचा झपाटयाने
माझे सेनापती विकासकामे करित असून त्यांच्या विकासकार्याची गती वाढणारी ठरली आहे.अशा माझ्या सेनापतीचे मी एकनिष्ठेचा सैनिक असून माझ्या सेनापतींचे जे आदेश
असेल ते आशिर्वाद समजून मी पुर्ण करण्यासाठी सदैव तयार असेल कारण जीवनाचे पैलू गुरूवर्यांच्या
आशिर्वादाने सार्थ होत असते आणि माझ्या जीवनाचा शिल्पकार माझ्या वडिलांबरोबर माझे सेनापती
विकासपर्व,गोरगरिबांचा आधार वटवृक्ष,विकासाचे
वादळ,कोकणाचा आधारस्तंभ श्री.किसनराव कथोरे
साहेबच आहेत.माझ्या रक्तातुन एकनिष्ठेची धुरा वाहत असून सन
2014 ते श्वास असेपर्यंत हा सैनिक म्हणून मी माझ्या
सेनापती बरोबरच राहणार असल्याच्या प्रतिक्रिया मुरबाड नगरपंचायतीचे मा.नगराध्यक्ष,उद्दयोगपती मोहन सासे यांनी एका औचित्य कार्यक्रमा
दरम्यान आमच्याशी बोलतांना सांगितले आहे.
Post a Comment