BIG BREAKING NEWS...

एएनएम व जीएनएम ची चौकशी बरोबर मुरबाडमध्ये त्या डॉक्टरांचे रिनीव्हयुशन नाही ; क्लिनीक सील करण्याची लेखी पत्रान्वये केली मागणी...

 

(दि.28,POL - कुणाल शेलार,मुरबाड)

मुरबाड तालुक्यामध्ये एएनएम आणि जीएनएम मुद्दा चर्चेचा ठरत चालला असून गाव खेडेपाडयात नागरिकांवर उपचार करतांना काम करणारे कर्मचारी यांचे करण्यात आलेल्या प्रशिक्षणाची चौकशी करण्याच्या मागणी सोबत ज्या डॉक्टरांची पदवी रिनीव्हयुशन झालेली नाही अशा क्लिनीक किंवा हॉस्पिटलला सील करण्याची मागणी लेखी पत्रान्वये आज करण्यात करण्यात आली आहे.

          मिळालेल्या माहिती नुसार डॉक्टरांची ठरविलेल्या वार्षिकेला त्या डॉक्टराची एमसीआयएम, एमसीएच,एमएमसी येथे रिनीव्हयुशन करणे असते परंतु मुरबाड तालुक्यात काही डॉक्टरांचे हे रिनीव्हयुशन पेंडीग असल्याचे प्रथमदर्शनी कळून येत असून क्लिनीक किंवा हॉस्पिटल सुरू असल्यास हेच अनोंदणीकृत डॉक्टर नागरिकांवर स्वतः उपचार करित असल्याचा संशय असल्याने सदर सविस्तर माहिती चौकशी दरम्यान सिध्द होर्इल हे मात्र निश्‍चित असताना याबाबत गांभिर्यतेने प्रश्‍न लक्षात घेता याकडे लक्ष वेधून संबंधित विभागाने चौकशी करून चौकशी दरम्यान दोषी आढळल्यास ते क्लिनीक किंवा हॉस्पिटल तत्काळ सील करावे अशी मागणी आता लेखी पत्रान्वये करण्यात आलेली आहे.यामध्ये ज्या डॉक्टरांची रिनीव्हयुशन पेंडीग आहेत अशांची नावे सुत्रांकडे असल्याने मुरबाड शहरातील एमबीबीएस डॉक्टराचे रिनीव्हयुशन एक्सपायर झाले असल्याचे कळते.सदर लेखी पत्र पारदर्शक भूमिका पाहणार्‍या विभागाकडे आज सुपुर्त केले असून याबाबत लवकरात लवकर चौकशी करावी अशी विनंती मागणी करण्यात आली आहे.यावर आरोग्य विभाग काय व कधी कारवार्इ करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Post a Comment

Previous Post Next Post