(दि.27,POL - कुणाल शेलार,मुरबाड)
शिवळे येथिल विद्दयामंदीर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्दयालयाचे मा.मुख्याध्यापक श्री.हरिश्चंद्र विठ्ठल खापरे सर यांच्या आर्इ कै.गं.भा.रखमाबार्इ विठ्ठल खापरे यांचे वृध्दापकालाने रविवार दि.25/08/2024 रोजी निधन झाले आहे. कै.गं.भा.रखमाबार्इ विठ्ठल खापरे यांनी आपल्या जिवनात घाम गाळून कष्टाने वैभव केले असुन त्याच कष्टाच्या परिस्थितीत आपल्या कुटूंबाला सांभाळत मुला मुलींचे शिक्षण पूर्ण केले.त्यांच्या पराकष्टाची जाण मुलांनी जाणली होती त्यामुळे त्याची प्रचितीच कोणी मुख्याध्यापक तर कोणी शिक्षक,शासकीय अधिकारी,स्वतःचे व्यवसायातुन उभारी घेतांना दिसले आहेत.प्रेमाच्या अथंग सागरात आर्इ आपले जे कर्तव्य करते त्याची परत फेड जगातला कोणताही मुलागा मुलगी करू शकत नाही.वात्सल्यसिंधु आर्इ म्हणुन कै.गं.भा.रखमाबार्इ विठ्ठल खापरे यांनी समाजात आपल्या मुलाबाळांना आदर्श,संस्कार देऊन प्रतिष्ठित व्यक्तीमत्व म्हणून घडवून आज परमेश्वराघरी गेल्याने त्यांची कमतरता आज चारही भिंतीला भासवत आहेत.गावातील प्रत्येक सुख दुखःत कै.गं.भा.रखमाबार्इ विठ्ठल खापरे या असायच्या.संपूर्ण आयुष्य दुसर्याच्या सुखःच्या शोधात राहणार्या आर्इ आज या जगात नसल्याने त्या घराची छत्रसावली हरपली आहे.
कै.गं.भा.रखमाबार्इ विठ्ठल खापरे याचे दशक्रिया विधी मंगळवार दि.03/09/2024 रोजी श्री क्षेत्र पिंपळेश्वर मठ येथे होणार असून उत्तरकार्य
विधी बुधवार दि.04/09/2024 रोजी श्री क्षेत्र पिंपळेश्वर मठ येथेच होणार आहे.कै.गं.भा.रखमाबार्इ विठ्ठल खापरे यांच्या पश्चात श्री.हरिश्चंद्र विठ्ठल खापरे
सर (मुलगा),सौ.उर्मिला
लक्ष्मण बांगर(मुलगी),सौ.सुरेखा सुरेश गोडांबे(मुलगी),श्री.भाऊ पांडुरंग खापरे(पुतण्या),श्री.गणपत रामचंद्र खापरे(पुतण्या),श्री.खंडु गोविंद खापरे(पुतण्या),श्री.केशव गोविंद खापरे(पुतण्या),श्री.दिनेश लक्ष्मण खापरे खापरे(नातु),श्री.निलेश मोतीराम खापरे सर(नातु)असा परिवार असून खापरे परिवारावर आलेल्या दुखःला सावरण्याची शक्ती त्यांना
परमेश्वर देवो अशी प्रार्थना.
Post a Comment