BIG BREAKING NEWS...

आजीबाईंच्या शाळेत विशेष ॲक्टिव्हिटी कार्यक्रम संपन्न ; अगस्त्या फाऊंडेशनचे रिंकू पडवळ व तेजस्विता माळी यांच्या जीवनातील अनोखा अविस्मरणीय ठरला क्षण

 

BY,दि,29 - मयुरी शेलार, मुरबाड

दिनांक 21/12/2024 रोजी अगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशन व सोसायटी जनरल शिवळे सायन्स सेंटर यांच्या वतीने फांगणे या गावात आजीबाईंची शाळा या ठिकाणी विशेष ॲक्टिव्हिटी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.ठाणे जिल्हयाच्या मुरबाड सारख्या ग्रामीण भागातून परदेशात आजीबाईंची शाळा ही प्रसिध्द झाली असून आजीबार्इच्या शाळेतील आजीबाईंना मागे कोन बनेगा करोडपती या कार्यक्रमात इतिहास संशोधक योगेंद्र बांगर सर यांच्या अथाग प्रयत्नातून व त्यांच्या माध्यमातून संपूर्ण जगासमोर आल्या होत्या त्यामधून आजीबाईंची ओळख आजही सर्वांना अविस्मरणीय ठरली आहे.या मुरबाड तालुक्यातील फांगणे गावातील 70 वर्षावरील आमच्या आजीबाईंनी आपली गोडी शिक्षणात निर्माण केली असल्याने अनेक राज्यातून व्यक्तिमत्वांनी आजीबाईंची भेट घेऊन त्यांचे कौतुकही केले आहे.

याच फांगणे गावात आजीबाईंसाठी Agastya international foundation व सोसायटी जनरल शिवले सायन्स सेंटर यांच्या वतीने विशेष ॲक्टिव्हिटी राबविण्यात आले.यामध्ये 29 आजीबाई आजच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.या कार्यक्रमाचे आयोजन अगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशनचे रिंकू पडवळ मॅडम व तेजस्विता माळी यांनी केले असल्याने या विशेष ॲक्टिव्हिटीमध्ये आजीबाईंना काही मॉडेल दाखवण्यात आले.जसे की त्यांना हृदय,दात,हृदयाचे ठोके मोजणारा श्रवणयंत्र त्याचबरोबर त्याबद्दलचीही माहिती सांगण्यात आली.काही पेपर ॲक्टिव्हिटीही घेण्यात आले असून पेपरपासून होडी,पंखा,फुले,विमान यांसह अन्य अशा अॅक्टिव्हिटींचा समावेश प्रामुख्याने घेण्यात असल्याचे पाहायला मिळाले.शिक्षणाला वयाच बंधन नसते तसच जसे शाळेतल्या मुलांना पोशाख असतो त्याप्रमाणे आजीबाई ना देखील गुलाबी नववारी असा पोशाख आहे.त्याचबरोबर पाठीवर दप्तर घेऊन रांगेत जसे विद्यार्थी येतात अशा प्रकारे आजीबाई या ॲक्टिव्हिटीमध्ये सामील झाल्या होत्या.यावेळी अगस्त्या फाऊंडेशनचे रिंकू पडवळ मॅडम व तेजस्विता माळी यांनी आजीबाई या 70 वर्षाच्या पुढील व या वयात देखील त्यांची शिकण्याची ओढ बघून आजीबाईंचे कौतुक केले.

या कार्यक्रमाची सुरुवात paper activity पासून झाली त्या मध्ये टॅलेंट search activity घेण्यात आली विविध ॲक्टिव्हिटीसह सदरचा दिवस हा आजीबाईंसोबत आनंदाने गेल्याने आजीबाई सुध्दा खूप झाल्या होत्या यावेळी आजीबाईंनीही छान प्रकारे या कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्साहाने प्रतिसाद दिला.यावेळी अगस्त्या फाऊंडेशनचे रिंकू पडवळ मॅडम व तेजस्विता माळी यांनी आजीबाईंनी जीवनातील अविस्मरणीय वेळ आम्हाला दिल्याने त्यांचे आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post