BIG BREAKING NEWS...

आमदार किसनराव कथोरे यांनी विविध धडाडीचे प्रश्नावलीने गाजवले अधिवेशन ; प्रत्येक प्रश्नाला हिरवा कंदील....

 

दि,03,POL,कुणाल शेलार,मुरबाड -

तेव्हाही साहसी धाडसी बळ आणि आताही वाघ एकला राजाचे धाडसी बळ जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सज्ज झाले असल्याचे मुरबाड विधानसभेचे आमदार किसनराव कथोरे यांच्या माध्यमातून अधिवेशात अवघ्या महाराष्ट्राने पाहिले असून मायभूमी आणि कार्यभूमीच्या आपल्या मातीसाठी यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 2025 गाजविले असल्याने त्यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्‍नाला सर्वांनुमते हिरवा कंदील देऊन पुन्हा एकदा आमदार श्री.कथोरे मंत्री पेक्षा कमी नाहीत हे सिध्द झाले आहेत.राज्याचे मुख्यमंत्री यांनी बदलापूर येथील आपल्या प्रबोधनात आमदार किसनराव कथोरे यांच्या पाठिशी प्रत्यक्ष स्वतः मुख्यमंत्री उभा आहे असे म्हणून तेच मुख्यमंत्री आहेत असे म्हणून तेव्हाच सर्वांना सांगून गेलेत कि सर्वात जास्त प्रेम आमदार किसनराव कथोरे यांच्यावर आहे.

अधिवेशनात आमदार श्री.कथोरे यांनी सर्वाधिक प्रश्‍न विचारले आहेत त्यातच त्यांचे सर्वाधिक निधी आणण्यात कोणीच हात पकडू शकत नाही.यंदाच्या अधिवेशनात तर धुराळाच उडवून टाकल्याने या धुराळात विकासकामांसह शेतकरी बांधव यांचे मुलभूत प्रश्‍न,भ्रष्टाचार,रोजगार निर्मिती,माळशेज घाटात काचेचे स्कायवॉक,प्रकल्पग्रस्त भूसंपादन प्रक्रिया,पुरवणी मागणीतून मुरबाड न्यायालय इमारत नव्याने बनविणे यांसह बदलापूर शहराच्या विकासाचे प्रश्‍न विधानसभेत मांडण्यात आले.या विविध प्रश्‍नाला तात्काळ हिरवा कंदील मिळाल्याने मंत्री मंडळ आता जलदगतीने निर्णय घेण्यासाठी सज्ज झाले असून 1 एप्रिल 2025 च्या मंत्री मंडळ निर्णयात ठाणे जिल्हयातील मुरबाड तालुक्यातील 500 शेतकर्‍यांना धानासाठी पणन हंगाम सन 2020-21 करिता प्रोत्साहनपर 79 लाख 71 हजार 292 रूपयाचे अनुदान मंजूर करण्यात आले असल्याने मुख्यमंत्री व मंत्री मंडळ महोदयांसह आमदार किसनराव कथोरे यांचे आभार मानण्यात आले आहे.मुरबाड शहराचे लुक बदलत असून विकासाला गती वेगवान पध्दतीने आली असल्याने आमदार किसनराव कथोरे परमानंट आमदार असल्याने त्यांच्या हातूनच कायापालट होल यात शंका नाही.महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेते पाहिले परंतु आमदार किसनराव कथोरे यांच्या सारखा होणे नाही कारण आमदार श्री.कथोरे जे बोलतात ते करूनच दाखवतात आणि त्यांची कार्यशैली ही जनतेच्या मनात कायमच घर करून बसलेली आहे त्यामुळे आले गेले किती शंभर,आमदार किसनराव कथोरे राहणार एक नंबर.

 

Post a Comment

Previous Post Next Post