BIG BREAKING NEWS...

मुरबाड ग्रामीण रूग्णालयात डोळयांचे तज्ञ डॉक्टर सुरेश धनगर दर सोमवारी नागरिकांच्या सेवेसी सज्ज

 

 (दि.28,POL - मयुरी शेलार, मुरबाड)

मुरबाड तालुक्यातील नागरिकांना मुरबाड ग्रामीण रूग्णालयामध्ये चांगल्या सोयी सुविधांचे उपचार मिळावे याकरिता शासनाच्या माध्यमातून जिल्हाशल्यचिकित्सक ठाणे चे श्री.कैलास पवार यांनी विशेष लक्ष केंद्रित केल्याने येथिल नागरिकांना चांगल्या उत्तम दर्जाचे सुविधा उपलब्ध झाले आहे.विविध प्रकारचे तज्ञ डॉक्टर या रूग्णालयात नागरिकांना सेवा देण्याकरिता उपलब्ध असल्याने नागरिकांची गर्दी ग्रामीण रूग्णालयात पहायला मिळत आहे.दिवसाची 200 च्या वर जाणारी ओपीडीच्या आकडेवारीत वाढ झाली असल्याचे कळून येत आहे.मुरबाड ग्रामीण रूग्णालयाचे प्र.वैद्दयकीय अधिक्षीक वर्ग 1 चे डॉ.प्रसन्नकुमार देशमुख यांनी पदभार स्विकारल्यापासुन या रूग्णालयात अमुलाग्र बदल घडवून आणले आहे त्यामुळे त्यांना मानणारा जनसमुदाय वर्ग त्यांच्या कार्याचे गुणगान गात आहे.याच बरोबर ज्यांनी गेल्या अनेक वर्षापासून नागरिकांना मार्गदर्शन करून कित्येकांची आपल्या सेवेभावातुन माणसुकी जपली असे मुरबाड ग्रामीण रूग्णालयातील डोळयांचे तज्ञ डॉक्टर सुरेश धनगर यांचे कार्य कौतुकास्पद ठरले आहे.हजारो जनसामान्यांच्या नेत्रासंबंधी योग्य ते मार्गदर्शन करणारे डॉ.सुरेश धनगर यांनी आपले आयुष्यच लोककल्याणाकरिता अर्पण केले आहे.एका आठवडयाचा त्यांचा संपुर्ण ठाणे जिल्हयाच्या ग्रामीण भागात असलेल्या ग्रामीण रूग्णालयात ठरलेल्या प्रत्येक वारीचा दौरा व त्यांची उपस्थिती नागरिकांना शासकीय सेवेच्या लाभातुन मिळत आहे त्यामुळे जनतेच्या सेवेसी एकनिष्ठेने गेल्या अनेक वर्षापासुन सेवा देत त्यांचा दांडगा होणारा अनुभव आज शासनाच्या प्रति नागरिकांचा विश्वास वाढवणारा ठरला आहे.नागरिक हेच प्रथम माझे कुटूंब त्यांची काळजी घेऊन त्यांना सेवा देणे हे एक माझे कुटूंब प्रमुख म्हणून जबाबदारी आहे या उद्देशात्मकतेतुन डॉ.सुरेश धनगर हे मुरबाड ग्रामीण रूग्णालयात दर सोमवारी नागरिकांना सेवा देण्यासाठी सज्ज असतात.येथिल रूग्णालयात लहान मोठे वयोवृध्द ज्येष्ठ नागरिकांच्या डोळयांचे सखोल तपासणी करून त्यांना डोळयांच्या असलेल्या व नसलेल्या आजारावर उपचार करण्यासंबंधी कळविले जाते.काही बाबतीत शस्त्रक्रिया करण्याचे असल्यास थेट जिल्हा स्तरावरील जिल्हा शल्यचिकित्सक ठाणे येथील शासनाच्या माध्यमातून शस्त्रक्रिया होत असल्याने तेथे जाऊन उपचार घेण्याचा सल्ला अतिशय प्रामाणिकपणे समजावून सांगतांना दिसले आहेत.डोळयाचे स्पेशालिस्ट म्हणून डॉ.सुरेश धनगर यांच्या याच त्यांच्या कार्यातुन जी नागरिकांची सेवा मुरबाड तालुक्यासह इतर तालुक्यात होत आहे याबाबत त्यांच्या कार्याची दखल दै.पॉवर ऑफ लोकशाही वृत्तपत्राने घेतली आहे.डॉ.सुरेश धनगर यांच्या नैतिकतेच्या समाजसेवी कार्यामुळे लोकप्रतिनिधींसह,वरिष्ठ अधिकारी,डॉक्टरांमध्ये त्यांच्या कार्याची पाहोच पावती त्यांच्या गतिमान कार्याच्या गुनगाणात सांगुन जात आहे.

 

Post a Comment

Previous Post Next Post