(दि.28,POL - कुणाल शेलार, मुरबाड)
भारतीय जनता पार्टी मुरबाड तालुका आणि मुरबाड
शहर आयोजित म्हसायात्रेनिमित्त कार्यकर्ता मेळावा आणि स्नेहभोजन कार्यक्रमाचे
आमदार किसनराव कथोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आले असता या
कार्यक्रमात सांगितिक कार्यक्रमाने शोभा वाढविली यावेळी महाराष्ट्राचा आवाज ठरलेले
गायक श्री.महेश कंटे यांनी सांगितिक कार्यक्रमात आपल्या मधुर आवाजात सदरच्या
कार्यक्रमात वेगळीच बहर आणली.यावेळी आमदार किसनराव कथोरे यांनी गायक श्री.महेश
कंटे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करून त्यांचे स्तुत्य कौतुक
केले.यावेळी व्यासपिठावर उल्हासभाऊ बांगर,सुरेश बांगर सर,लियाकत शेख सर,भोर्इरदादा
यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment