BIG BREAKING NEWS...

मुरबाडचा गुटखा किती दिवसाचा घटका,तरूणांच्या जीवाला बसणार जोराचा फटका

 

(दि.28,POL - कुणाल शेलार, मुरबाड)

मुरबाड तालुक्यात सर्रासपणे गुटखा,मटका अवैधधंद्दे सुरू असून संबंधित यंत्रणा कारवार्इ करण्यास अपयशी ठरली आहे.काही दिवसांपुर्वी गुटखावर धाड पडली त्यानंतर आम्ही माहिती प्राप्त केली असता तिघं जण गुटखा धंदा करित असून त्यांना गुटखा देणारा हा गोपनिय क्षेत्रातील असल्याने तोच गुटखा मुरबाडमध्ये आणून देत असल्याची चर्चा आता कळून येत आहे.हप्तेसुराचे मानकरी मुक गिळून गप्प असल्याने नागरिकांच्या जीवाला कारणीभूत ठरणारा गुटखा सर्रासपणे खुलेआम विकला जात असल्याने बातमी आल्यास या गुटख्याची जागा बदलली जाते.यांच्याच घराच्या किराणा दुकानात विमल,माणिकचंद,कोल्हापूरी,गोवा विक्री होत असल्याने काय कारवार्इ होणार असा प्रश्नच उभा राहत आहे.आम्ही बातम्या टाकल्या की अधिकारी गोडी गुलाबीने ओळखीचा फायदा घेऊन त्याच्या हप्तेवर गदा येणारी दुर करतो त्यामुळे खरे यांच्यावरच कारवार्इ व्हायला हवी म्हणून वरिष्ठांनी लक्ष केंद्रित केले पाहिजे.मुरबाडचा गुटखा किती दिवसांचा बसेल तरूणांना घटका असे जरी आपण म्हणत असलो तरी तो त्यांच्या जीवाला देणारा जोराचा झटका असेल.गुटखा डिलर हे फोर व्हीलर मध्ये आल्याने हप्तेबाजीचा अधिकारी लपून लपंडावी खेळ करित आहे.कोण आहे जो मुरबाडमधील तिन लोकांना सर्रासपणे गुटखा पुरवित आहे त्याबाबत सविस्तर गोपनिय माहिती व गुटखा पोहोचविणारे ते तीन डिलर यांची नावे पॉवर ऑफ लोकशाहीच्या अखेर हाती लागली असून ती नावे लवकरच मंत्रालयात पुराव्यानिशी गुटखा पुडी सोबतच जाणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत असून मटका धंद्दयावाल्यानी मात्र मातानगरमध्ये बस्तानच घातला आहे.मन्नुभार्इ वॉर्इन शॉप जवळील मटका धंदा शेटर आड करणारे यांचा लेखाजोखा लवकरच पोलखोलमध्ये येणार असल्याने या बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या मटका धंद्दयावाल्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post