(दि.29,POL - भिवंडी)
भिवंडी तालुक्यातील पिंपळास गावातील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचा बांधकाम अत्यंत निकृष्ठ दर्जाचा करण्यात आला असल्याने ही इमारत बांधून जेमतेम 12 ते 15 वर्ष झाले असतील तरीही या इमारतीची अवस्था अत्यंत धोकादायक झाली आहे, गेल्या काही महिन्यांपासून शाळेच्या इमारतीचे कॉलम क्रॅक झाले असुन मोठ मोठ्या भेगा पडल्या आहेत, स्ल्याबचा प्लास्टर बऱ्याच ठीकाणी कोसळत आहे. शालेय शिक्षण समिती पिंपळास यांच्या वतीने देखील शिक्षण विभागास पत्रव्यवहार करण्यात आला आहे. परंतु शिक्षण विभाग मात्र दुर्लक्ष करित असल्याचे निवेदनकर्ते यांच्याकडून बोलले जात आहे.
या शाळेत जवळ जवळ 225 ते 250 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत,निकृष्ठ दर्ज्याच्या कामामुळे सदर इमारत कमकुवत झाली आहे. तरी देखील शाळेचे सर्व वर्ग याच धोकादायक इमारतीत भरत आहेत त्यामुळे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला असुन दुर्दैवाने एखादी दुर्घटना घडल्यास यास जबाबदार कोण? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला असुन विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची इजा झाल्यास ही सर्वस्वी जबादारी आपलीच असेल असा मा. शिक्षण आधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग जि. प. ठाणे, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. ठाणे, मा. कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग ठाणे, मा. गट शिक्षण अधिकारी पं. स. भिवंडी व गट विकास अधिकारी पं. स. भिवंडी यांस पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
तरी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पर्यायी जागेची व्यवस्था त्वरित करण्यात यावी व तात्काळ धोकादायक इमारत पाडून नविन इमारत बांधण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असुन लवकरात लवकर हा प्रश्न सोडवुन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अन्यथा शिक्षण विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भुमीपुत्र शेतकरी संघटना पिंपळास यांच्या वतीने लेखी पत्राद्वारे देण्यात आला आहे.
-----------------------------------------------------------------
शाळेची इमारत बांधून जेमतेम 12 ते 15
वर्ष झाले असतील तरी देखील इमारतीची अवस्था धोकादायक झाली आहे, म्हणजेच शाळेचा अत्यंत निकृष्ठ दर्जाचा बांधकाम करण्यात आला असुन यात मोठ्याप्रमाणात गैरव्यवहार झाला असण्याची दाट शक्यता असुन तत्कालीन ठेकेदार, इंजिनिअर व संबंधित शासकीय
अधिकारी यांच्यावर आमच्या संघटने मार्फत लवकरच कारवाई करण्याची मागणी करणार आहोत.
श्री. जगदीश वसंत पताळे ( अध्यक्ष भुमीपुत्र शेतकरी संघटना पिंपळास )
-----------------------------------------------------------------
Post a Comment