BIG BREAKING NEWS...

श्री.ह.भ.प.दत्तात्रेय बाबा यांच्या संकल्पनेतून कळमखांडे येथे श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन...

 

(दि.22,POL - कुणाल शेलार,मुरबाड)

गेल्या 22 ते 23 वर्षापासून नित्यनियमाने मुरबाड तालुक्यातील कळमखांडे गावात श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे कार्यक्रम करण्याची परंपराला आजही प्रतीसालाबादप्रमाणे पाहायला मिळत आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही श्री....दत्तात्रेय बाबा यांच्या संकल्पनेतून श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आज गुरूवार दि.22/02/2024 ते रविवार दि. दि.25/02/2024 पर्यंत कळमखांडे गावातील ह...चिंतामण दत्तात्रेय कापडी,...हरीचंद्र दत्तात्रेय कापडी यांनी आयोजित केले असून आजपासून या सोहळयाला आरंभ करण्यात आले आहे.

कळमखांडे गावातील श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठया उत्साहात साजरा केला जात असून या सोहळयाला तालुक्यतील वारकरी सांप्रदायीक,टाळकरी,माळकरी,वारकरी यांची मोठया संख्येने उपस्थिती असते.गेल्या अनेक वर्षापासूनची ही परंपरा पार पडत असून या सोहळयाला भाविक भक्तगणांची या श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाला उपस्थिती मोठया संख्येने येत असून दर्शनासह महाप्रसादाचा लाभ घेत आहे.

याच सोहळयाला आजपासून आरंभ झाले असून या सोहळयाला भाविकांनी नामयज्ञात उपस्थित राहून श्रवण सुखाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे या सोहळयाचे आयोजक कळमखांडे गावातील ह...चिंतामण दत्तात्रेय कापडी,...हरीचंद्र दत्तात्रेय कापडी,प्रवीण कापडी यांनी या माध्यमातून सांगितले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post