BIG BREAKING NEWS...

माजी सभापती सौ.स्वरातार्इ सचिन चौधरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सिनेअभिनेत्री रेश्मा शिंदे व हजारो महिला उपस्थित ; आमदार किसनराव कथोरे व सौ.कमलनानी कथोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वराताईंना मिळाला दिर्घायुष्याचे आशिर्वाद…

 

(दि.01,POL - कुणाल शेलार,मुरबाड)

मुरबाड तालुक्याच्या झालेल्या सर्वच विकासाचा विचार केला तर महाराष्ट्राचे लाडके आमदार किसनराव कथोरे यांचेच नाव समोर येते.विकास करतांना आमदार श्री.कथोरे यांनी योग्य व्यक्तींची केलेली निवड विकासाचा मानबिंदू ठरला आहे.गाव खेडे पाडयातुन झपाटयाने झालेला विकास सार्थ अभिमान सांगून जात आहे.

याच विकासनगरीत महिला म्हणून रणरागिनी जी माणूसकी झरीतून समाजाच्या प्रत्येक घटकात जाऊन जनसामान्य लोकांचा व त्यांच्या विविध प्रश्नांचा,अडीअडचणीचा विचार करून त्यांना मदत करून महिलांसाठी सक्षमीकरणाची सत्यतेची वाटचाल ठरू शकेल अशा सौ.स्वरातार्इ सचिन चौधरी यांच्या पाठिशी सदैव एक वडिल म्हणून समाजशील कार्यशैलीची तालुका विकासाची जबाबदारी सोपविली आणि ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी एकनिष्ठेने कटिबध्द झाल्या अशा नामवंत असलेले वकिल अडॅ.सचिनभाऊ चौधरी यांच्या पत्नी सौ.स्वरातार्इ सचिन चौधरी यांनी मुरबाड पंचायत समितीच्या सभापती म्हणून पदभार स्विकारत विकासपर्व रचून दाखवून विश्वास संपादीत करून हजारो जणांची मने जिंकून घेतली अशा सौ.स्वरातार्इ सचिन चौधरी यांचा वाढदिवस तुळर्इ येथे रंग माझा वेगळा या मालिकेच्या अभिनेत्री रेश्मा (दिपा) शिंदे व हजारो महिलांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आले.

सौ.चौधरी तार्इ यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो महिलांना हळदीकूंकु करून त्यांना भेट वस्तु देऊन एक अनोखा वाढदिवस तुलर्इ येथे साजरा करण्यात आला त्याचबरोबर लकी ड्रॉ च्या माध्यमातून 10 पैठणी,3 मिक्सर,3 कुकर व 1 शेगडी चे विजेत्यांना सिने अभिनेत्री रेश्मा (दिपा) शिंदे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.या वेळी महाराष्ट्राचे लाडके आमदार श्री.किसनराव कथोरे व सौ.कमलनानी किसन कथोरे यांनी भेट देऊन सौ.स्वरातार्इ सचिन चौधरी यांना दिर्घायुष्याचे आशिर्वाद देण्यात आले.कमी कालावधीतच कमविलेली ज्येष्ठ नागरिक,महिला,भाऊ,बहिणीं यांच्या गर्दीने स्वराताईंची खरी माणूसकी झरी नैतिकता जपणारी सांगून जात आहे.

प्रत्येक घटकांतील व्यक्तीच्या सुख दुःखात माजी सभापती सौ.स्वरातार्इ सचिन चौधरी यांची साथ मिळाली असून त्यांच्या कार्याची पाहोचपावती ही या वाढदिवसाचे औचित्याने दिसून आली.म्हणतात प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या यशामागे त्याच्या पत्नीचा सिंहाचा वाटा असतो परंतु स्वराताईंच्या यशामागे त्यांचे पती अॅड.सचिनभाऊ चौधरी यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे.अनेकांनी मनोगतात आपले विचार मांडत असताना ताईंना जीवनसाथी लाखमोलाचा लाभला असून सचिनदादांसारखे पती आपल्या प्रत्येक वळणार साथ देत आहेत अशा दोघांना पुढिल वाटचालीस शुभेच्छाही यावेळी देण्यात आले आहे.




या वाढदिवसाला अॅड.झुंझारराव सर,उद्दयोगपती श्री.राजेश पाटील,भाजपा सरचिटणीस नितीन मोहपे सर,मा.सभापती दिपक पवार,मा.पंचायत समिती सदस्य अनिलदादा घरत,संचालक सुरेश बांगर सर,मुरबाड नगरपंचायतीचे उपनगराध्यक्षा सौ.मानसी देसले,पत्रकार सौ.मयुरी कुणाल शेलार,ॅड.वैशालीतार्इ घरत,सुहासजी मोरे,लॅबचे रविंद्रजी पठारे,देवा गु्रप संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोज देसले,युवा नेतृत्व बाळा घरत,सुधिर तेलवणे,अनुसूचित जाती अध्यक्ष अण्णा साळवे,रिपार्इ अध्यक्ष दिनेश उघडे तसेच मोठया संख्येने तालुक्यातील नामवंत व्यक्ती,ज्येष्ठ वयोवृध्द,महिला माता भगिनीं,शिक्षक,सरपंच,उपसरपंच,युवा नेतृत्व,पत्रकार,भाजपा कार्यकर्ते,समस्त तुळर्इ,नारिवली,डोंगरन्हावे परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post