(दि.07,POL - कुणाल शेलार,मुरबाड)
शांताराम भाऊ घोलप कला विज्ञान व गोटीरामभाऊ पवार वाणिज्य महाविद्यालय शिवळे येथील अर्थशास्त्र व आयक्यूएसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने व्यक्तिमत्व विकास या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा संपन्न झाली.या कार्यशाळेकरीता डॉ.एस एस बुधवंत (सोनूभाऊ बसवंत महाविद्यालय शहापूर) व प्रो.डॉ.विलास बी गायकर उपस्थित होते.व्याख्यातांचे स्वागत व सत्कार महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापक पी.डी सोनवणे सर यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यशाळेकरिता वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख डॉ.एस एस पवार,व प्रा. वि सी पाटील,डॉ.एस.एस.गवरे,डॉ.शैलेश डोंगरे,डॉ.एल.आर.संते उपस्थित होते.या कार्यशाळेकरिता महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.जी.आर.विशे मॅडम यांचे शुभेच्छा व सहकार्य लाभले.या कार्यशाळाकरिता 60 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला.तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ.एस.एम.बिराजदार व आभार डॉ.एस.एस.पवार यांनी मानले.
Post a Comment