(दि.10,POL - कुणाल शेलार,मुरबाड)
मुरबाड तालुक्यातील
देवगाव येथिल वारकरी सांप्रयदायेमध्ये नावाजलेले आणि जनसामान्यांकरिता आपले आयुष्य
अर्पण करणारे मुरबाड शहराचा चमकणारा चेहरा कान्हू विठू भांडे यांच्या निधनाने आज हरपला
आहे.नेहमी सर्वांना सांभाळून घेत वाद विवाद संपुष्टात आणण्यासाठी त्यांच्यात सिंहाचा
धाडसपणा सर्वांना ज्ञात आहे.त्यांचे प्रत्येक समाज कार्यात अमुल्य
असे योगदान असायचे.कुटूंब संभाळत जनसामान्यांसाठी त्यांचे समाजशील
कार्य माणूसकीची झरी जपणारी ठरली आहे.मोठया कष्टाने त्यांनी आयुष्याला
सुरूवात केली असता सगळयांवर मायेचा हात हा कायम राहिला आहे.प्रत्येकांच्या
सुख दुखःत कान्हू विठू भांडे यांनी आपला सहभाग आपण कुटूंब सदस्य असल्याचे माणून आठवणीचा
शिक्का नोंदविला आहे.नैतिकता जपताना कधी सत्याचा मार्ग न सोडता
आलेल्या प्रत्येक समस्यांना सामोरे जाऊन संकटावर मात केली आहे.हजारो गोरगरिबांना मायेचा आधार देणारे कै.कान्हू विठू
भांडे यांचे दुखःत निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात त्यांचा भाऊ,मुलगी,मुलगा,नातू असा परिवार आहे.भांडे परिवारावर आज दुखःचे वातावरण पसरले असून त्यांना दुखः सावरण्याकरिता
परमेश्वर शक्ती देवो ही प्रार्थना.
Post a Comment