(दि.14,POL
- कुणाल शेलार,मुरबाड)
मुरबाड विधानसभा
मतदार संघात विकासाचा कायापालट झालेला असून याचे श्रेय नेहमी विकासाचे वादळ म्हणून
चर्चेत असलेले मुरबाड विधानसभेचे ढाण्यावाघ आमदार किसनराव कथोरे यांचे आहे.आमदारकीची
तीन वेळा हॅट्रीक मारली असून जेव्हापासून विकासाचा मानबिंदू गगनात कोहिनुरसारखा चमकला
आहे.मुरबाड तालुक्यात तहसिलदार प्रशासक इमारतीपासून गावखेडे रस्ते,शासकीय योजना,ग्रामपंचायत,मुरबाड
नगरपंचायत,पर्यटन स्थळे,मुरबाड पोलीस ठाणे,गोडाऊन,ग्रामीण रूग्णालय मुरबाड ट्रामा केअर,छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य अश्वारूढ स्मारक,मुरबाड बाजारपेठ,बस सेवा सुरू,कन्या
दत्तक योजना,किसन कन्या स्वागत योजना,विद्दयार्थी
कौशल्य विकास योजना,शालेय साहित्य वाटप,मुख्यमंत्री सहायता निधी अन्य विविध ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्याची मदत मिळवून
देणे,ठाणे जिल्हयाचा पाण्याचा प्रश्न मार्गी,बदलापूर येथील निसर्ग उद्दयान,जलयुक्त शिवार योजना,मतदार संघात बेंचेस,मतदार नोंदणी मोहीम,ओपन जिम,राष्ट्रीय महामार्ग,अंधेरी-शिळफाटा-बदलापूर-वांगणी मेट्रो
प्रकल्प-तिर्थ क्षेत्रांचा विकास यांसह अनगिणत असे विविध विकासकामे
त्यांच्या प्रयत्नांतून झालेली असून काही प्रकल्प प्रगतीपथावर आहेत त्यातच मुरबाड बस
स्थानकाचे नवे बांधकाम हे देखील प्रगतीपथावर आहे.विकासाचे चमकणारा
हिरा म्हणून त्यांच्या कार्याची सदैव चर्चा महाराष्ट्रात होत असुन त्यांना तमाम जनतेनी
माझे महाराष्ट्राचे लाडके,कोकणाचे आधारस्तंभ,कार्यसम्राट आमदार म्हणून किसनराव कथोरे यांना उपमा दिली आहे.साहेब हा शब्द तोंडावर येत जरी असला तरी आप्पा आणि बाबा हे मुखातून येणारे
शब्द मात्र हृदयातून येतांना अनेकांच्या तोंडून ऐकले आहेत.आमदार
किसनराव कथोरे हे सर्वधर्म समभावाने असून लाखो दिलो कि धडकन असे नवयुवकांच्या व्हॉट्सअप
वर स्टेटस पाहायला मिळाले आहे.आमदार श्री.कथोरे यांच्या कार्यशैलीत पुन्हा 2024 मध्ये विकासाचा
वादळ कधी थांबला नव्हता अन कधी थांबणार नाही याचे औचित्यच टोकावडा ग्रामीण रूग्णालयाच्या
पाठपुराव्यावरून दिसून आले आहे.ठाणे जिल्हा सिव्हील सर्जन शल्यचिकित्सक
डॉ़.कैलास पवार यांनी नागरिकांच्या सेवेसाठी आपले आयुष्य बहाल
केले असून सदैव नागरिकांना आरोग्य सुविधेबरोबर डॉक्टर,औषधसाठा,कर्मचारी यांची कमतरता पडू नये म्हणून शासनाकडे पाठपुरावा केला आहे.या पाठपुराव्याला आमदार किसनराव कथोरे यांचे मात्र सिंहाचा वाटा ठरला आहे.असाच पाठपुरावा आमदार किसनराव कथोरे यांनी शासनाकडे टोकावडे ग्रामीण रूग्णालयाबाबत
केले असता 30 खाटांचे सध्या असलेले रूग्णालयाल आता हेच उपजिल्हा
रूग्णालय म्हणून ओळखले जाणार असून 50 खाटांच्या उपजिल्हा रूग्णालयामध्ये
एक विशेष बाब म्हणून श्रेणीवर्धन करण्यास मान्यता 01 जुलै
2024 च्या महाराष्ट्र शासनानी शासकीय जिआर काढून दिली आहे.यामध्ये बांधकाम व पदनिर्मिती करणेबाबत स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येर्इल
असे नमूद असून सदरचे परिपत्रक संबंधित विभागांना पाठविण्यात आले असून मुरबाड तालुक्यातील
मुरबाड ग्रामीण रूग्णालयाबरोबर टोकावडा ग्रामीण रूग्णालय आता उपजिल्हा म्हणून ओळखले
जाणार आहेत.आमदार किसनराव कथोरे यांच्या पाठपुराव्याला यश अखेर
आले असून जे आमदार श्री.कथोरे साहेब करू शकतात ते कोणीच करू शकत
नाही असे येथील नागरिकांकडून बोलले जात आहे.नव्या रूपात नव्या
वर्षात विकासाच्या वादळाला कोणी रोखू शकले नाही आणि कोणी रोखणारही नाही अशी चर्चा आता
होत आहे.आमदार श्री.कथोरे यांचे ध्येय विकासाला
नवी चालना देणारी असून सर्वात निधी आणणारा विकासाचा बादशाहा म्हणून त्यांची ओळख होत
आहे.आमदार किसनराव कथोरे यांनी जो पाठपुरावा केला आणि यशस्वीही
झाले त्याबद्दल मुरबाड तालुक्यातील तमाम नागरिक,जनतेने,कार्यकर्ते यांनी त्यांच्यासह त्यांची सावली म्हणून नेहमी चर्चेत राहिले असे
ठाणे जिल्हा सिव्हील सर्जन शल्यचिकित्सक डॉ़.कैलास पवार यांचेही
संबंधित अधिकारी,कर्मचारी,नागरिकांनी आभार
मानले आहे.
Post a Comment