(दि.04,POL
- कुणाल शेलार,मुरबाड)
मुरबाड तालुक्यातील
तळागळापर्यंत मुरबाड तालुका आरोग्य विभाग जनजागृती तसेच शासनाच्या विविध योजना मिळवुन
देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहिली असून सदरच्या योजनेचा लाभ लाभार्थी पर्यंत पाहोचविण्यास
अव्वल दर्जा प्राप्त करित असल्याने या विभागातील संबंधित कर्मचारी यांचे योगदान अमुल्य
ठरले आहे.मुरबाड तालुका आरोग्य अधिकारी श्रीधर बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध
गाव स्तरावरील आरोग्या विषयी मिटींग आढावा,आयुष्यमान कार्ड,आभा कार्ड,नवजात बालक जन्माला आल्यावर त्या महिलेला शासनाच्या
माध्यमातून देण्यात येणार्या 5 हजाराचा
लाभ,पारदर्शकपणे नियमाने त्यांच्या अधिपत्याखाली येणार्या पीएचसी व क्लिनीक यांची वरिष्ठ महोदयांच्या मार्गदर्शनाखाली भेट देऊन नागरिकांना
योग्य आरोग्य सुविधा मिळत असल्याबाबत खातरजमा करणे,आलेल्या विविध
तक्रारीवर वरिष्ठांना कळवून त्याबाबत तक्रारदारांचे निरासरण करणे यांसह अन्य विषयामध्ये
मुरबाड तालुका आरोग्य विभागाचे काम उत्तुंग असल्याने धडाडीचे व कार्यशील माणसातील माणूसकी
जपणारे या विभागाचे तालुका आरोग्य अधिकारी श्रीधर बनसोडे यांच्यासह कर्मचारी वर्गांचे
कार्याविषयी कौतुक जेवढे करावे तेवढे कमी असून मध्यस्थी प्रभारी पदभार सांभाळलेले तालुका
आरोग्य अधिकारी श्रीमती.भारती बोटे मॅडम यांच्या कालावधीत कुष्टरोगासंदर्भात
सर्व्हे केल्याने चांगले काम झाल्याने मुरबाड तालुक्याच्या कामाची पोहोच पावती वरिष्ठांकडे
गेल्याने मुरबाड आरोग्य विभागाचे अभिनंदन करण्यात आले होते.अलीकडे
तालुका आरोग्य अधिकारी विभागाने आयुष्मान कार्ड घरोघरात पाहोचविण्यासाठी अपार प्रयत्न
केले याकरिता संबंधित गाव खेडे पाडयातील सेविका यांच्या सहकार्यातुन या योजनेंतर्गत
गावातीेल लोकांची नोंदणी जलदगतीने करून सदरचे आयुष्मान कार्ड आज नागरिकांच्या हातात
गेल्याने 5 लाखाचे मोफत उपचार मिळणार म्हणून सर्वत्र नागरिकांनी
मुरबाड तालुका आरोग्य अधिकारी श्रीधर बनसोडे व त्यांचे विभाग अधिकारी,कर्मचारी,सेविका यांचे आभार मानले आहेत.
Post a Comment