(दि.05,POL
- कुणाल शेलार,मुरबाड)
ठाणे जिल्हा हा राज्यात मोठा जिल्हा असून 7 महानगरपालिका या जिल्हयात येतात.याच ठाणे जिल्हयातील ग्रामीण भाग मोठया प्रमाणात असून गाव खेडे पाडयात नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिने त्याना चांगल्या प्रकारे आरोग्य सुविधा मिळावे म्हणून शासनाच्या माध्यमातून विविध योजना,शिबीरे घेण्यात येत असतात.सदर ठाणे जिल्हयातील तालुक्यातील ग्रामीण रूग्णालयात असंख्य नागरिक उपचार घेण्याकरिता येत असल्याने गेल्या 15 वर्षापूर्वी आणि आज 15 वर्षानंतरच्या सुविधांचा विचार केल्यास मोठया प्रमाणात बदल झालेला दिसला आहे.ठाणे जिल्हयाचा प्रामुख्याने विचार लक्षात घेतले असता महाराष्ट्राचे लाडके आमदार किसनराव कथोरे यांनी सदैव नागरिकांना चांगल्या दर्जाचे उपचार मिळावे म्हणून नव्या बदलाचा पाठपुरावा केला आहे.त्यांच्या कार्यशैलीवर अनेकांनी बोट ठेवला परंतु त्याकडे कधी लक्ष न वेधता त्यातून अजून ते उजळून येत अनेक ग्रामीण रूग्णालयाचा सुशोभिकरण व इतर सुविधा उपलब्ध करणेसाठी पाठपुरावा केला व त्याचेच सुंदर चित्र मुरबाड ग्रामीण रूग्णालय तसेच ट्रामाकेअर उदाहरण म्हणून आज समोर आहे.ठाणे जिल्हयातील ग्रामीण रूग्णालयात यंत्र सामुग्री,डॉक्टर,स्टाफ यांसह औषधे भरमसाठ उपलब्ध करून देण्यात ठाणे जिल्हा सिव्हील सर्जन शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार यांचाही सिंहाचा वाटा असल्याचे नागरिक बोलत आहेत.
सीएस.डॉ.कैलास पवार यांच्या कार्यक्षेत्रात येणार्या ग्रामीण रूग्णालयात बदल झाला आहे.त्यांच्या कार्यकाळात रूग्णालयाचा कायापालट झाल्याचे साक्षीदार आम्ही आहोत.ठाणे जिल्हा सिव्हील सर्जन शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार यांचे प्रशासकीयाबरोबर हृदयाचे दार गोरगरिबांसाठी 24 तास खुले ठेवल्याने त्यांच्याकडे कोणताही गरिब गरजू कामानिमित्त गेल्यास रिकाम्या हाती परतला नाही.मुरबाड ग्रामीण रूग्णालय स्वच्छतेसह अतिशय शिस्तबध्दीने काम करित असल्याचे मागील वर्षी दिल्ली येथून 1 नंबरचा शेरा देत बक्षीस पटकावले होते.यावेळी तमाम मुरबाडकरांनी अभिमान बाळगला होता हे सर्व आमदार किसनराव कथोरे व ठाणे जिल्हा सिव्हील सर्जन शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार यांच्या प्रयत्नांमुळे व ग्रामीण रूग्णालयाच्या अधिकारी कर्मचारी मुळे शक्य झाले आहे.
अशाच बदलेचे चारही
दिशेस असलेले ग्रामीण रूग्णालयात बदल घडवून आणण्यात ठाणे जिल्हा सिव्हील सर्जन
शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार यांनी अपार प्रयत्न केले असता आज नागरिकांचा सुविधा
उपलब्ध झालेल्या आहेत.श्री.डॉ.पवार यांनी तर कोणताही आरोग्याच्या दृष्टिने समस्या,प्रश्न उदभवल्यास थेट मला संपर्क करा असे आवाहनच केले आहे.असे माणसातील
माणूसकी जपणारे प्रशासक अधिकारी कमीच पाहायला मिळतात आणि असे प्रशासक आम्हाला ठाणे
जिल्हयाला ठाणे जिल्हा सिव्हील सर्जन शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार यांच्या रूपाने
लाभले हे ठाणे जिल्हयाचे भाग्यच म्हणावे लागेल.
Post a Comment