BIG BREAKING NEWS...

मुख्यमंत्री लाडकी बहीणीच्या खात्यात 3 हजार जमा ; बँकेत लाडक्या बहिणींची आधार लिंकसह पैस काढण्यासाठी कुतूंब गर्दी...

 


(दि.16,POL - कुणाल शेलार,मुरबाड)

महाराष्ट्र राज्यात महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढली असून या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रूपये त्यांच्या खात्यात जमा केले जाणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली.सदरील लाडक्या बहिणींची ही योजना जेव्हापासून घोषित केली तेव्हापासून अर्थात जूलै महिण्यापासून दरमहा 1500 रक्कम देण्याचे ठरले होते.त्यामुळे जूलै व ऑगस्ट असे 2 महिण्याचे एकूण 3 हजार रूपये थेट पात्र ठरलेल्या बहिणींच्या खात्यात 17 ते 19 ऑगस्ट पर्यंत जमा करण्यात येणार असून सदर योजनेचे दोन महिण्यांची रक्कम 15 ऑगस्ट रोजीच महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले असल्याची माहिती कळून येत आहे.

दोन महिण्याचे हप्ते एकदमच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाल्याने सर्व महिलांना मॅसेज आले असल्याने सर्व महिलांनी बँकेत धाव घेतली आहे.रक्षाबंधन जवळ आले असल्याने लाडक्या बहिणींनी खात्यातून पैसे काढण्यासाठी एकच गर्दी केल्याने रस्त्यापासून ते थेट बँकेच्या आतमध्ये कुतूंब गर्दी केली आहे.मुरबाड तालुक्यात हजारोच्या संख्येने शहर,गाव खेडे येथे असलेल्या बँकेत खात्यातील रक्कम काढण्यासाठी हजेरी लावली आहे.विशेषतः ज्यांच्याकडे एटीएम नाही ते बँकेत पाहोचले तर ज्यांच्याकडे एटीएम आहेत त्यांनी एटीएममध्ये रांग लावली असल्याचे दिसले आहे.मुरबाड शहरातील टिडीएससी बँकेत तर तुफान गर्दी पाहायला मिळाली असून घामाच्या धारेत लाडक्या बहिणींनी आपल्या खात्यातील 3 हजार रूपयाची रक्कम काढून खाते वजा केले आहे.

बँकेच्या आतमध्ये जाण्यासाठी सुध्दा जागा नसल्याने एकच तारांबळ उडाली असल्याचे कळते.त्याचबरोबर एसबीआय बँकेच्या बाहेर व एटीएम स्थळी महिलांनी गर्दी केली असता गाडयांची पार्कींगच तयार झाली होती.तालुक्यातील काही महिलांना लाडकी बहीण योजनेची रक्कम आधार कार्ड बँकेला लिंक नाही किंवा आधारकार्डला नंबर लिंक नाही अशांना मिळाले नसल्याने त्यांनीही पात्र लवकरात लवकर ठरून या योजनेचा लाभ आपल्याला मिळावा म्हणून गर्दी केली होती.राज्य सरकारने कोणतीही मुख्यमंत्री लाडकी बहिण या योजनेपासून वंचित राहणार नाही असे सांगितले असून ज्यांचे आधारलिंक नसेल अशा महिलांनी लवकरच बँकेत जाऊन आपल्या खात्याशी आधार लिंक करून घ्यावेत असे पुनश्‍च आवाहन केले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post