BIG BREAKING NEWS...

शाळेच्या घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणुन आरोपीस अटक करण्यात किन्हवली पोलीसांना यश...

 

(दि.27,POL - शहापुर)

दिनांक 13/08/2024 रोजी 19.23 वाजता गुन्हयातील फिर्यादी श्री.गिरीश गोपाळ सुरोसे, वय-31 वर्षे, व्यवसाय- नोकरी (लिपीक),रा- मु. खेवारे, पो- धसई, ता-मुरबाड, जि- ठाणे यांनी फिर्याद दिली की, ते काम करत असलेल्या मौजे चरीव, ता- शहापुर, जि- ठाणे येथील नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात दिनांक 10/08/2024 रोजी 11.30 ते दिनांक 12/08/2024 रोजी सकाळी 09.00 वाजताचे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरी करण्याच्या उद्देशाने शाळेचे दरवाजाचे कडी कोयंडे ताडेुन शाळेत प्रवेश करुन शाळेतील 65,600/- रुपये किंमतीच्या शाळोपयोगीवस्तु फिर्यादी यांच्या संमतीशिवाय चोरी करुन चोरुन नेल्या आहेत.त्यावरुन किन्हवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक 145/2024 भारतीय न्याय संहीता कलम 305, 331(3), 331(4) प्रमाणे दाखल करण्यात आला होता.नमुद गुन्हयाचे तपास अनुशंगाने मा.डॉ.डी.एस.स्वामी.पोलीस अधीक्षक साो,ठाणे ग्रामिण,मा.डॉ.दिपाली धाटे,अपर पोलीस अधीक्षक सो,ठाणे ग्रामिण,मा.मिलिंद शिंदे,उपविभागीय पोलीस अधिकारी साो,शहापुर विभाग शहापुर यांचे मार्गदर्शनाखाली पथक तयार करुन गुन्हयाचा तपास चालु केला.

ग्रामिण भाग असल्याने घटनास्थळी कोणतेही सीसीटीव्ही फुटेज मिळुन आले नाहीत.त्यामुळे सदर गुन्हयांसंदर्भात कोणेतेही धागेदोरे उपलब्ध नसतानां गुन्ह्याचे गांभिर्य ओळखुन अतिशय बारकाईने तपास करुन काही फिल्ड लेवल तर काही तांत्रीक बाबींची सखोल माहीती घेवुन त्याचे सुक्ष्म विवेचन करुन पुरावे गोळा करुन आरोपीचा गुन्ह्यातील सहभाग निश्चित केला.सदर गुन्ह्याचा कौशल्यपुर्ण तपास करुन घटनास्थळाचे आजुबाजुचे परीसरात सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले. तसेच यापुर्वी पोलीस ठाण्यात दाखल असलल्ेया शाळेतील घरफोडी चोरीच्या गुन्हयातील संशयीत यांचे मोबाईल क्रमांकाचे सीडीआरचे अवलोकन करुन आणि गुप्त बातमीदार यांचेकडुन माहीती प्राप्त केली असता,सदरचा गुन्हा हा आरोपींनी मिळुन केला असल्याचे निष्पन्न झाले.सदर आरोपींचा शोध घेतला असता ताब्यात घेऊन तपास केले असता आणखीन गुन्हे केले असल्याची गुन्हयाची कबुली दिली.सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर तळेकर हे करित आहेत.

          सदर गुन्हा घडल्यानंतर आरोपी हे अज्ञात असल्याने आरोपींबाबत माहिती प्राप्त करून त्यांचे शोधार्थ पोलीस ठाणे येथून पथक तयार करण्यात आलेले होते.आरोपींची माहिती काढून त्यांचा अवघ्या 12 तासाचे आत शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आलेली आहे.या तपासात किन्हवली पोलीस ठाण्याचे सपोनि.नितीन खैरनार,पोउपनि.शरद सुरळकर,पोउपनि.रामेश्वर तळेकर,पोहवा.गोलार्इत,पोना.गणेश पवार,पोना.प्रविण मोहपे,पोशि.सचिन चोरघे, पोशि.हर्षद बडेराव, पोशि.अर्जुन पारधी, पोशि.नवनाथ गवारी, पोशि.शरद शिरसाठ, पोशि.दत्तात्रय बेलवले, पोशि.सतिष शेलवले, पोशि.विक्रांत महाजन, पोशि.जगदीश देसले,मपोशि.सुरेखा गायकर,मपोशि.दिपाली सासे,पोहवा.दिपक गायकवाड,पोहवा.रविंद्र मोरे,नेम किन्हवली पोलीस ठाणे व नेम अभिवेक्षण शाखा ठाणे ग्रामिण यांनी सदरची कामगिरी केलेली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post