(दि.17,POL
- कुणाल शेलार,मुरबाड)
महाराष्ट्राचे लाडके
व मुरबाड विधानसभा मतदार संघाचे धडाडीचे ढाण्यावाघ कार्यसम्राट आमदार किसनराव
कथोरे यांचे 19 सप्टेंबर रोजी वाढदिवस असल्याने
त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत यंदा थेट जनतेलाच वाढदिवसाची भेट दिली
आहे.भारतीय जनता पार्टी मुरबाड आयोजित आमदार किसनराव कथोरे यांच्या
वाढदिवसानिमित्त चक्क 50 टक्के सवलतीच्या दरात सायकल व एलइडी
टिव्ही उपलब्ध करून वाटप करण्यात येणार असल्याने सदरचा सवलतीच्या दराचा कालावधी 18
सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर 2024 रोजीपर्यंत असणार आहे याकालावधीत इच्छुकांनी आधारकार्ड/मतदानकार्ड असे
आवश्यक कागदपत्रेसह माऊली गार्डन,म्हसा रोड,मुरबाड येथे प्रत्यक्ष भेट देऊन किंवा 7219881588/8459772373 या क्रमांकावर संपर्क साधाण्याचे आवाहन करण्यात आले असून या आयोजित
कार्यक्रमाचे दि.18 सप्टे 2024 रोजी
सकाळी ठिक 9 वाजता आमदार किसनराव कथोरे यांच्या प्रमुख
उपस्थितीत उद्घाटक सोहळा पार पडणार आहे त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधी,पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिकांनी या उद्घाटन
सोहळयाला उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी मुरबाड यांच्यावतीने
करण्यात आले आहे.
Post a Comment