(दि.21,POL
- कुणाल शेलार,मुरबाड)
महाराष्ट्राचे लाडके, मुरबाड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार किसनराव कथोरे यांचे अत्यंत जवळचे असलेले जनसेवक विझन फ्रेंड साकिब गोरे यांनी गेले 33 वर्षे प्रत्येक गाव पातळीवर नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप,मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर असा अनोखा उपक्रम राबवित असून या उपक्रमात असंख्य नागरिकांना भारतीय नागरिक म्हणून मदतीचा हात दिला आहे.जनसेवा हीच खरी संपत्ती असल्याची माणुसकीची भावना जाणसामान्यांना भाऊन गेली आहे.
स्वकष्टाच्या नफ्यातून सेवा विझन फ्रेंड साकिब गोरे आजही करीत असून मोठया जोमाने हा उपक्रम राबवितांना स्वतः साकिब गोरे हे यांचे नागरिकांप्रतीचे समाजकार्य दिसून येत आहेत. असाच उपक्रम मुरबाड तालुक्यातील किशोर गावात काल पार पडला.या समाजसेवी नेत्र तपासणी,मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीरात 271 नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.यामध्ये 187 दृष्टिदोष नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले असून ऑक्टोबर महिण्यात सदरील मोतीबिंदु असणार्या नागरिकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे विझन फ्रेंड साकिब गोरे यांनी आमच्याशी बोलतांना सांगितले आहे.
विझन फ्रेंड साकिब गोरे यांचे जनसेवेसाठी एक पाऊल पुढे सदैव पुढे असून त्यांना आमदार किसनराव कथोरे यांच्याकडुन समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळाली असल्याने आमदार श्री.कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा अनोखा शिबीर उपक्रम साकिब गोरे राबवित असल्याने नागरिकांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून विझन फ्रेंड साकिब गोरे यांच्यासह त्यांच्या सहकार्यांचे नागरिकांकडून अभिनंदनासह आभार व्यक्त होत आहे व तसेच त्यांच्या पुढिल सेवाभावी वाटचाल कार्याला शुभेच्छा मिळत आहेत.
Post a Comment