वीर हुतात्मा भाई कोतवाल विद्यालय, म्हसा. ता .मुरबाड या विद्यालयात 26 जानेवारी हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्त्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
शालेय परिसरात सडा, रांगोळीने,सजवून देशभक्तिपर गितांची मधुर पर्वणी मिळाली. विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ चंद्रमणी मोहिते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तत्पूर्वी क्रीड़ा शिक्षक भानुदास लोहार यांनी क्रीड़ा संचालन करुण राष्ट्रीय झेंड्याला मानवंदना देण्यात आली.तदनंतर राष्ट्रगीत,ध्वजगीत, देशभक्तिपर गितांच्या कार्यक्रम झाला.
"हे राष्ट्र खूप सुंदर आहे. आपण सारे संविधानाचे उपासक आहोत.या संविधानामुळेच आज,आपण स्वतंत्र आणि भयमुक्त जीवन जगत आहोत. या मुळेच तर आपली प्रगती गगनविहारी आहे. त्यात पुन्हा ज्ञान-विज्ञान अति उच्चशिखरावर आहे. हा परमानंद माणसाला माउंट एव्हरेस्ट शिखराकडे घेवून जातो. हा सर्व उन्नतीचा आलेख या राष्ट्रीय थोर पुरुषांमुळे आहे". असे गौरोदगार डॉ मोहिते यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.महेंद्र बेंद्रे यांनी प्रस्ताविक करून सूत्रसंचालन केले. सामाजिक कार्यकर्ते मगन घागस,संतोष व्यापारी यांनी आपले विचार व्यक्त केले. सेवा निवृत्त PSI बंधू भोईर, संदीप भोईर, महाराष्ट्र बैंकेचे अधिकारी हरिश्चन्द्र शेलवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
विद्यार्थ्यांची गावात प्रभात फेरिचे नियोजन करण्यात आले होते. सहवादय आणि राष्ट्रीय घोषणांनी संपूर्ण परिसर देशभक्तिमय झाला.तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार प्रा.मोहिते यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला.प्रसंगी सुनिल रेंघे, जगन्नाथ कथोरे, राहुल प्रधान,भानुदास घागस,विद्या बैरागी, मीनाक्षी गोडांबे,धनश्री साबळे,सारिका कडाळी,पूजा कुर्ले,रमा पष्टे, आणि सचिन डामसे यांनी विशेष परिश्रम घेतले.आणि वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Post a Comment