BIG BREAKING NEWS...

रेनबो सनरार्इज इंग्लिश मिडीयम स्कूल मुरबाड येथे प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिक वितरण सोहळा संपन्न...

 

दि,13,POL,कुणाल शेलार,मुरबाड -

ऋणानुबंध सामाजिक संस्था रेनबो सनराज इंग्लिश मिडीयम स्कूल मुरबाड गेल्या अनेक वर्षापासून विविध प्रकाराच्या कार्यक्रमाचे आयोजन करित आले आहे.विद्दयार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी यशाची गुरूकिल्ली या शाळेतून विद्दयार्थ्यांना देण्यात येते.या शाळेतून आजपर्यंत शेकडो विद्दयार्थ्यांनी शिक्षण घेत आपल्या उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल केली आहे.उत्तम व दर्जेदार शिक्षण आणि शिक्षकांनी या शाळेचे नावलौकिक केवळ तालुक्यातच नव्हे तर जिल्हयात केले आहे.या शाळेत पालकांशी शिक्षकांचा संवाद जवळीक असल्याने मुलांवर बारकाने लक्ष केंद्रित केले जाते.आपणही आ वडिलांच्या मेहनतीमुळे मोठया पराकष्टाने शेतकरी पुत्र म्हणून गरिबीतून शिक्षण घेतले ती वेळ कोणावरही येऊ नये म्हणून ऋणानुबंध सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रेनबो सनराज इंग्लिश मिडीयम स्कूल मुरबाडमध्ये गरिबातील गरिब मुलाला कमीत कमी फी मध्ये प्रवेश दिला जात आहे आणि ही संस्कृत विचार मनोधारणा युवा नेतृत्व असलेले भूमिपुत्र श्री.पंढरीनाथ बुधाजी टोले सरांनी जपली त्यामुळे आज ही शाळा उभी राहून शेकडो विद्दयार्थी शिकत आहेत.

जन्मभूमी आणि कर्मभूमी एकच असावी असा विचार मनात रूजून ज्या मातीत जन्म घेतले त्या मातीसाठी काही तरी करावे या विचाराने रेनबो नावाचे ज्ञानरूपी शाळा सन 2013-14 साली सुरू केले.15 वर्षापूर्वी इंग्रेजी माध्यमाच्या शिक्षणाची मक्तेदारी होती,श्रीमंताच्या मुलांनीच इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेऊ शकेल असा एक व्यवसायच होता परंतु सामान्यांच्या मुलांना अशा शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते,सामान्यांच्या मुलांनाही चांगल्या दर्जेदार पध्दतीने शिक्षण मिळावे अशा दृढ विचाराने ही शाळा ऋणानुबंध सामाजिक संस्था रेनबो सनराज इंग्लिश मिडीयम स्कूल मुरबाडचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य पंढरीनाथ बुधाजी टोले यांनी सुरू केली.जग बदलायचं असेल तर बंदुकीपेक्षा शब्दांचा दबाव निश्‍चितच जास्त असतो त्यामुळे या शाळेतून यशस्वी कवी,वक्ते,वर्कृत्व स्पर्धेच्या माध्यमातून विद्दयार्थ्यांना घडविण्याचे कार्य आज या शाळेतून सुरूच आहे.सर्वच प्रकाराच्या कलेला वाव देण्यासाठी विद्दयार्थ्यांमध्ये ती रूजवली जात असून येथील शालेय प्रशासन उत्तमपणे काम करित आहे.दरवर्षी क्रिडा मोहोत्सवात मार्गदर्शन करण्यासाठी राज्यस्तरावर पुस्कार प्राप्तकरांना आमंत्रण केले जाते.या शाळेत सर्वच प्रकाराचे सण,उत्सव,संस्कारी धार्मीक व अध्यात्मिकता यांची ओळख विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून करून देण्यात येते.या वटवृक्षाचे बीज पंढरीनाथ टोले सरांनी रूजविले तर त्याचे संगोपण संवर्धन करण्याचे काम शिक्षक वृंद व शिक्षक कर्मचारी यांनी केले आहे.पंढरीनाथ टोले सर अनेक सामाजिक क्षेत्रातून अनेकांना मदतीसाठी कार्यरत राहिले आहे त्यामुळे त्यांची दखल घेऊन त्यांना मागील वर्षी दैनिक पॉवर ऑफ लोकशाही वृत्तपत्राच्या वतीने उत्कृष्ट प्राचार्य म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे.ज्यावेळी ही शाळा उभी राहिली त्यावेळी कमी विद्दयार्थी होते परंतु पालकांनी या शाळेला पसंती दर्शवून आजरोजी या शाळेत नर्सरी ते 10 वी पर्यंत 600 ते 700 विद्दयार्थी शिक्षण घेत आहे.मागील 10 वीच्या बोर्डाचा विचार केला तर या शाळेचे 100 टक्के असा निकाल लागला आहे.या शाळेतून विद्दयार्थ्यांना शिक्षण देऊन त्यांना उज्ज्वल यशाकडे नेऊन बळकटी दिले जाते.इतकेच नव्हे तर या शाळेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य श्री.पंढरीनाथ टोले सरांच्या पराकष्टाने ही अशी पहिलीच शाळा आहे की जी मुरबाड तालुक्यात आयएसओ नामांकन मिळविणारी आहे.

इतकेच नव्हे तर ऋणानुबंध सामाजिक संस्था रेनबो सनराज इंग्लिश मिडीयम स्कूल मुरबाड सन 2023-24 सालात राज्य शासनाच्या माध्यमातून इंग्रजी माध्यमाची एकमेव शाळा म्हणून मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा असा एक नंबर पटकावून 1 लाखाचे बक्षिसही प्राप्त केले आहे.दरवर्षी विद्दयार्थ्यांना त्यांनी सादर केलेल्या प्रत्येक कलागुणांना वाव मिळावी म्हणून त्यांना गौरविण्यात येत असते याचीच परंपरा या वर्षीही या शाळेच्या माध्यमातून जोपासली असता सन 2024-25 सालातील नर्सरी ते दहावी विद्दयार्थ्यांना सन्मानित करून त्यांना पारितोषिकांसह सन्मानपत्र प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाची सुरूवात प्रमुख मान्यवरांनी दिपप्रज्वलनासह महाविरांना अभिवादन करित पुष्प अर्पणाने करण्यात आले.या कार्यक्रमाला आमदार किसनराव कथोरे हे प्रमुख पाहुणे असल्याने त्यांना अचानक मुंब मंत्रालयात जावे लागल्याने आमदार श्री.कथोरे यांनी फोनद्वारे सर्वच विद्दयार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

या कार्यक्रमाला यावेळी व्यासपिठावर मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री.सुरेश बांगर सर,श्री.सदाशिव सोमणे(सरपंच-बेलपाडा),श्री.जुगलभा जाखोटिया सर(संस्थापक-ज्ञानदीप विद्दयालय,मुरबाड),श्री.गणपत टोले(काका),पोलीस उपनिरीक्षक श्री.सुर्वे, पोउपनि.श्री.महाडीक, श्री.गणेश तुपे (देवगाव-पोलीस पाटील) यांसह अन्य प्रमुख मान्यवर उपस्थित होते,यावेळी रेनबो सनराज इंग्लिश मिडीयम स्कूलचे संस्थापक तथा प्राचार्य श्री.टोले सर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून आपले प्रास्ताविक व मनोगत व्यक्त केले.त्यांच्या मनोगतात त्यांनी लवकरच विद्दयार्थ्यांसाठी लवकरच तांत्रिक ज्ञान म्हणून रोमोटिक लॅब तयार करण्यात येणार असल्याने विद्दयार्थ्यांच्या गुणवत्ता उंचशिखरावरसदैव राहिल असा विश्‍वास यावेळी व्यक्त केला.तर याच व्यासपिठावरून पोउपनि.श्री.सुर्वे यांनी विद्दयार्थ्यांना संरक्षित कसे ठेवाल याबाबत पालकांशी संवाद साधून अमुल्य मार्गदर्शन केले.श्री.सोमणे यांनीही या शाळेचे कौतुक करून श्री.टोले सरांचा एक नव्या ध्यास आहे,त्यांनी तंत्रज्ञान शिकवण्याची जी कला हाती घेतले आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदनही यावेळी केले.या सोहळयाला  विद्दयार्थ्यांनी सांस्कृतिक परंपरा कशी जोपासली जावी असा संदेश देत नृत्य सादर केले त्यामुळे या कार्यक्रमाला रंगबहार आले.या पारितोषिक वितरणाला प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते विद्दयार्थ्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले यावेळी माझ्या मुलानी आज माझे नावलौकिक केले असा आनंद प्रत्येक पालकांच्या चेहर्‍यावर दिसत होता.सदर सोहळा समारंभ पार पाडण्यासाठी शिक्षक वृंद शिक्षकोत्तर कर्मचारी,शाळा संरक्षक यांनी विशेष मेहनत घेतली.

Post a Comment

Previous Post Next Post