दि,03,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
महाराष्ट्राचे लाडके नावलौकिक धडाडीचे कार्यसम्राट आमदार किसनराव कथोरे यांची महाराष्ट्र शासनाने इतर मागासवर्ग कल्याण समितीच्या अध्यक्षपदी निवड केली आहे.सलग 5 वेळा आमदार पद भूषविलेले श्री.कथोरे यांच्या विकासाची गती गगनभरारी आहे.मुरबाड विधानसभेचा झालेला कायापालट त्यांच्या गतीमान कार्याची पोहोच पावती आहे आणि त्यामुळेच प्रत्येक नागरिकांच्या मनात व नवयुकांच्या गळयातील असलेले ताईत आमदार किसनराव कथोरे यांच्या निस्वार्थ कार्याची दखल वरिष्ठांनी घेतली असता त्यांच्यावर मोठी जबाबदारी ही सोपविली गेली आहे.ओबीसी समाजातील कुणबी समाजाचे प्रबळ नेतृत्व असलेले आमदार किसनराव कथोरे यांना मंत्री पद न दिल्याने ओबीसी समाजात प्रचंड नाराजीचा सुर उठला होता ती नाराजी कमी व्हावी म्हणून त्यांना इतर मागासवर्ग कल्याण समितीच्या अध्यक्षपदावर विराजमान करण्यात आले आहे असे जरी असले तरी एकही बोट त्यांच्यावर उठेल असा व्यक्ती नाही त्यामुळे कुणबी समाज मात्र याच आशेवर आहे कि कुणबी समाजाचा डॅशिंग नेते कार्यसम्राट आमदार श्री.कथोरे यांची पुढील अडीच वर्षाच्या यादीत नाव समाविष्ट करून वर्णी लागावी अशी मागणी अद्दयापही ज्वलंतच आहे.तरी आजच्या वेळेवर बारकाईने लक्ष केंद्रित केल्यास हीच वेळ आहे जिथं आमदार किसनराव कथोरे इतर मागासवर्गातील जनतेच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करून त्यांना न्याय मिळवून देऊ शकतात त्यामुळे '' देर हुई पर दुरूस्त हुवा '' असे म्हणणं वावगं ठरणार नाही.
ग्रामीण भागाच्या विकासाला झपाटयाने प्रगतीच्या
दिशेकडे नेण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहिलेले जनतेच्या मनातील नेते मुरबाड विधानसभेचे
कार्यसम्राट आमदार किसनराव कथोरे हे अखेर कोहिनुर हिरा सारखे चमकले आहेत.प्रत्येकांच्या
सुखात तर सर्वच असतात परंतु दुखःत जो असेल तोच खरा माणूसकीची झरी जपणारा व्यक्तीमत्व.असेच
व्यक्तीमत्व जपणारे आमदार किसनराव कथोरे आहेत.ते सर्वसामान्यांच्या अडचणी सोडीवण्यासाठी
त्यांचे जनता दरबार सकाळीच सुरू होते.प्रत्येक समस्या जाणून घेऊन सोडवितांना तमाम जनतेनी
पाहिले आहे त्यातच आता इतरमागासवर्ग कल्याण समितीच्या अध्यक्षपदी त्यांची महाराष्ट्र
शासनानी निवड केली असून आता खर्या अर्थाने ओबीसी समाजाच्या बांधवांना न्याय मिळेल
यात शंका नाही.अध्यक्षपदाची वर्णी लागताच आम्ही कधीच नॉटरिचेबल नसलेले आमदार श्री.कथोरे
यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधले असता एक चांगल्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नावर
लक्ष केंद्रित करून माझ्या ओबीसी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कटिबध्द असून
आता माझ्या बांधवांना काळजी करायचे काही कारण नाही असे त्यांनी आमच्याशी बोलतांना सांगितले
आहे.आमदार किसनराव कथोरे यांची इतर मागासवर्ग कल्याण समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने
संपूर्ण मुरबाड विधानसभेतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे तर मुरबाडमध्येही
समाजसेवक मनोज रमेश देसले,गणेश लाटे,निलेश गायकर यांनी बॅनर लावून आमदार श्री.कथोरे
यांना पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
Post a Comment