BIG BREAKING NEWS...

रोबोटीक तंत्रज्ञानाच्या शाळेत चला प्रवेश करूया ; रेनबो इंग्लिश मिडीयम स्कूल येथे भेट देऊया...

 

दि,07,POL,कुणाल शेलार,मुरबाड -

ऋणानुबंध सामाजिक संस्था रेनबो सनराज इंग्लिश मिडीयम स्कूल मुरबाड गेल्या अनेक वर्षापासून सुरू असून विद्दयार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी यशाची गुरूकिल्ली या शाळेतून विद्दयार्थ्यांना देण्यात येते.या शाळेतून आजपर्यंत शेकडो विद्दयार्थ्यांनी शिक्षण घेत आपल्या उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल केली आहे.उत्तम व दर्जेदार शिक्षण आणि शिक्षकांनी या शाळेचे नावलौकिक केवळ तालुक्यातच नव्हे तर जिल्हयात केले आहे.

 वडिलांच्या मेहनतीमुळे मोठया पराकष्टाने शेतकरी पुत्र म्हणून गरिबीतून शिक्षण घेतले ती वेळ कोणावरही येऊ नये म्हणून ऋणानुबंध सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रेनबो सनराज इंग्लिश मिडीयम स्कूल मुरबाडमध्ये गरिबातील गरिब मुलाला कमीत कमी फी मध्ये प्रवेश दिला जात आहे आणि ही संस्कृत विचार मनोधारणा युवा नेतृत्व असलेले भूमिपुत्र श्री.पंढरीनाथ बुधाजी टोले सरांनी जपली त्यामुळे आज ही शाळा उभी राहून शेकडो विद्दयार्थी शिकत आहेत.जन्मभूमी आणि कर्मभूमी एकच असावी असा विचार मनात रूजून ज्या मातीत जन्म घेतले त्या मातीसाठी काही तरी करावे या विचाराने रेनबो नावाचे ज्ञानरूपी शाळा सन 2013-14 साली सुरू केले.सामान्यांची मुलं शिक्षणापासून वंचित होती,सामान्यांच्या मुलांनाही चांगल्या दर्जेदार पध्दतीने शिक्षण मिळावे अशा दृढ विचाराने ही शाळा सुरू केली.

दरवर्षी क्रिडा मोहोत्सवात मार्गदर्शन करण्यासाठी राज्यस्तरावर पुरस्कार प्राप्तकरांना आमंत्रण केले जाते.या शाळेत सर्वच प्रकाराचे सण,उत्सव,संस्कारी धार्मीक व अध्यात्मिकता यांची ओळख विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून करून देण्यात येते.या वटवृक्षाचे बीज पंढरीनाथ टोले सरांनी रूजविले तर त्याचे संगोपण संवर्धन करण्याचे काम शिक्षक वृंद व शिक्षक कर्मचारी यांनी केले आहे. 10 वीच्या बोर्डाचा विचार केला दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी या शाळेचे 100 टक्के असा निकाल लागला आहे.

या शाळेतून विद्दयार्थ्यांना शिक्षण देऊन त्यांना उज्ज्वल यशाकडे नेऊन बळकटी दिले जाते.इतकेच नव्हे ही अशी पहिलीच शाळा आहे की जी मुरबाड तालुक्यात आयएसओ नामांकन मिळविणारी आहे,त्याचबरोबर या शाळेने सन 2023-24 सालात राज्य शासनाच्या माध्यमातून इंग्रजी माध्यमाची एकमेव शाळा म्हणून मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा अग्रस्थानी 1 लाखाचे बक्षिसही प्राप्त केले आहे.तर 2024-25 या वर्षी सुध्दा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत रेनबो सनराज इंग्लिश मिडीयम स्कूलनी तालुका स्तरावर द्वितीय क्रमांकांचे पारितोषिक प्राप्त करून 2 लाख रूपयाचे बक्षिस मिळविले आहे.

मुख्यतः म्हणजे या शाळेत प्रवेश करतांना महामानव,देश सैनिक,वीर हुतात्मे,सांस्कृतिक अध्यात्मिक विचारांचे चित्रीकरण लावण्यात आल्याने त्यांचे देश राष्ट्राप्रती असलेले कार्य विद्दयार्थ्यांना आपला इतिहास काय आहे हे सांगून जात असून आधुनिक युगातील डिजीटल असलेल्या या शाळेत विद्दयार्थ्यांसाठी तांत्रिक ज्ञान मिळावे म्हणून रोबोटिक लॅब तयार करण्यात आली असून तालुक्यात ही एकमेव शाळा आहे जी सर्वांच्या शाळेपेक्षा 100 पटीच्या पाऊलनी विद्दयार्थ्यांच्या गुणवत्ता उंचशिखराच्या भविष्याचे ध्येय गाठले आहे.रोबोटीक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या शाळेत विद्दयार्थ्यांना प्रत्यक्ष ज्ञान दिले जात आहे.या शाळेचे नव्या वर्षातील नर्सरी ते 10 वी पर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू झाले असून आपल्या पाल्याचा आजच प्रवेश निश्‍चित करण्यासाठी मुरबाड-बदलापूर रोड लगत नांदेणी रोड जवळील या शाळेला आजच भेट द्दया.

Post a Comment

Previous Post Next Post