दि,21,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
मुरबाड तालुक्यातील नामवंत
रसवंती व्यवसाय असलेले कै.राजेंद्र मधुकर शेळके यांचे अल्पशा आजाराने बुधवार दि.18/06/2025
रोजी निधन झाले आहे.अत्यंत गरिब परिस्थितीतून मोठया पराकष्टाने आपले वैभव उभे करतांना
त्यांच्या धर्मपत्नी उल्का राजेंद्र शेळके या खंबीरपणे त्यांच्या पाठिशी उभ्या राहिल्या.अनेक
संकटं आली त्यावर मात करून यशाचे शिखर गाठले.त्यांच्या कष्टाला तमाम तालुक्याने जवळून
पाहिले आहे.तमाम जनतेशी कौटूंबिक सदस्याने माणूसकी कमविली होती.पती पत्नीच्या पराकष्टामुळे
त्यांच्या मुलांचे शिक्षण उज्ज्वल भविष्याकडे त्यांनी नेली.नैतिकता जपून आध्यात्मिकतेची
ओढ त्यांच्या अंगी असल्याने कधीही कोणाशी वाद केले नाही.परंतु काळाने घात केला त्यांना
आजाराने पकडले तरीही त्यांनी त्यावर मात केली परंतु काळ आणि वेळ यावेळी एकदाच आली अन
अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून
माणसातला माणूस तालुक्याने आज गमविला.त्यांचे पश्चात त्यांची पत्नी,मुलगा,मुली पुतणे,नातू
असा परिवार आहे.कै.राजेंद्र मधुकर शेळके यांचे दशक्रिया विधी शुक्रवार दि.18/06/2025
रोजी सकाळी 9 वाजता श्री क्षेत्र घोडदेश्वर मंदिर (शिरगांव रोड) तर उत्तरकार्य विधी
सोमवार दि. दि.30/06/2025रोजी सकाळी 11 वाजता राहत्या घरी साई संसार शेळकेपाडा,न्यू
इंग्लिश स्कूलच्या मागे ता.मुरबाड येथे होईल.कै.राजेंद्र मधुकर शेळके यांना समस्त
साई संसार सोसायटी येथील कमिटी मेंबर यांनी भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली आहे.
Post a Comment