BIG BREAKING NEWS...

इएनटी स्पेशालिस्ट डॉ.माधवी सुरेश पंदारे (वैद्दयकिय अधिक्षीक वर्ग -1) मॅडम यांच्या निरोप समारंभात कर्मचारी नागरिक भाऊक

(दि.03,POL - संजना कापडी, मुरबाड)

गेल्या काही वर्षे महिण्यांपासून गोरगरिबांची सेवा करणारे व अचूक मार्गदर्शन करणारे गोवेली ग्रामीण रूग्णालयाचे डॉ.माधवी सुरेश पंदारे (वैद्दयकिय अधिक्षीक वर्ग  -1) मॅडम यांचे प्रमोशन झाल्याने त्यांची बदली भिवंडी उपजिल्हा रूग्णालयात झाली असून त्यांच्या बदलीने सर्वत्र कर्मचारी व नागरिकांच्या डोळयात पाणी आल्याने चांगले व्यक्तीमत्वाची अचानक चांगल्या कार्याची दखल घेऊन बदली झाल्याने आज झालेल्या निरोप समारंभात सर्वत्र नागरिकांसह कर्मचारी भाऊक झाले असल्याचे दिसून आले.


डॉ.माधवी सुरेश पंदारे (वैद्दयकिय अधिक्षीक वर्ग  -1) मॅडम या कान,नाक,घसा यांसह विविध आजारांवर तज्ञ डॉक्टर म्हणून त्यांचा अनुभव दांडगा असल्याने विविध आरोग्य शिबीर यशस्वी करण्यामागे व शासकीय आरोग्य योजनांची माहिती पोहोचविण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा ठरला असून त्यांच्या कार्याची दखल वरिष्ठ महोदयांनी प्रमोशनाद्वारे घेतली असून भिवंडी उपजिल्हा रूग्णालयात त्यांना नागरिकांच्या सेवेसी पाठविण्यात आले आहे.गेल्या अनेक महिण्यात डॉ.माधवी सुरेश पंदारे (वैद्दयकिय अधिक्षीक वर्ग  -1) मॅडम यांनी केलेल्या कामगिरीमुळे अनेक रूग्णांमध्ये कौटूंबिक जिव्हाळा तयार झाले असता आज निरोप समारंभात त्यांच्या कार्यशैलीविषयी सांगतांना अनेकांच्या डोळयातील पाणी त्यांनी जपलेली माणूसकी झरी कशा पध्दतीने असेल याचे हे सांगण्यासाठी शब्द अपुरे पडतील असेच म्हणावे लागेल.प्रत्येक नागरिकांना आदर सन्मान देऊन नेहमी हसरा चेहरा अनेकांच्या दुखःना सुख देणारे ठरले आहेत.स्वतःहून प्रत्येक नागरिकांची आपुलकीने विचारपूस करणारे व्यक्तीमत्वाची अचानक बदली झाल्याने सर्वत्र नागरिकांनी दुखः व्यक्त केले आहेत.


यावेळी निरोप समारंभ आयोजित केले असता डॉ.माधवी सुरेश पंदारे मॅडम (वैद्दयकिय अधिक्षीक वर्ग  -1) यांनी आजपर्यंत आपल्याला सर्वांनी जे कौटूंबिक जिव्हाळा आपुलकीचे प्रेम दिले त्याबद्दल निशब्द झाले असल्याचे त्यांनी त्यांच्या विचारात मांडले आहे.मी जरी एका तालुक्यातून दुसर्‍या तालुक्यात गेली असली तरी आपल्या सेवेसी मी कायम तत्परच आहे आणि राहिल असे आपल्या संभाषणात बोलतांना व्यक्त केले आहे.या निरोप समारंभात गोवेली महाविद्दयालयाचे श्री.रविंद्र घोडविंदे सर,पत्रकार कुणाल शेलार,गोवेली ग्रामीण रूग्णालयाचे सर्व डॉक्टर,अधिपरिचारिका,स्टाफ कर्मचारी,समस्त नागरिक यांनी डॉ.माधवी सुरेश पंदारे मॅडम यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post