BIG BREAKING NEWS...

मुरबाड विधानसभा मतदार संघ विकास पर्वाचे बादशहा आमदार श्री.किसनराव कथोरे

दि,१४,POL,कुणाल शेलार,मुरबाड - 

महाराष्ट्रातील मागील झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्यांनी निवडून आलेले महाराष्ट्राचे लाडके व सदैव विकास कामांच्या बाबतीत चर्चेत असलेले महाराष्ट्राचे विधानसभा सदस्य, मुरबाड विधानसभा मतदार संघाचे धडाडीचे आमदार श्री.किसनराव कथोरे यांनी त्यांच्या विधानसभेत विकासाचे बीज रोवून विकास संकल्प केले आहे.आमदार श्री.किसनराव कथोरे यांच्या विधानसभेत सर्वाधिक विकास निधी येत असल्याने विकास कामाच्या दर्जाने ठाणे जिल्ह्याचे नाव उच्चांक श्रेणीत विराजमान झाले आहे. सर्वांच्या मनात त्यांच्या कार्याची छबी ज्ञात असून राजकारणासह समाजकार्याचा वसा त्यांच्या हातून घडला आहे. त्यांनी शासकीय योजनांचाही लाभ जनसामान्य जनतेपर्यंत पोहोचविले असल्याने त्यांना आदराने आप्पा,बाबा,साहेब याच नावाने आवाज दिले जाते. विधानसभेत आपल्या मतदार संघातील तारांकित/अंतारांकित प्रश्न मांडून खऱ्या अर्थाने आमदार कसा असावा हे दाखवून दिले आहे.त्यांच्याकडे येणारा माणूस हा रती-महारती नसून सर्वसामान्य व्यक्तीशी नाळ जोडल्याने त्यांच्या कार्याचा ठसा हा प्रत्यक्षपणे उतरत आहे.त्यांच्याकडे आलेला प्रत्येक व्यक्ती हा त्यांच्या जनता दरबारातून रिकाम्या हाती परत जात नाही.अंबरनाथ,बदलापूर,शहापूर, मुरबाड यांसह महाराष्ट्रातील अन्य गाव,शहर,जिल्ह्यात त्यांच्या कार्याचा ठसा गरुड क्षितिजावरच राहिला आहे.

          आमदार श्री.किसनराव कथोरे एक विकास पर्वाचे बादशाह म्हणून ओळखले जात असून त्यांनी दिलेला शब्द पूर्ण करण्यात ते सदैव यशस्वीच राहिले आहेत.

विविध जनता दरबारातील प्रश्न, विकासकामे,अन्य अशा बाबतीत कागद त्यांच्या हातात कधी पाहिले नसून सर्व प्रश्नांचा व विकास कामांच्या कार्यांचा बंच हा त्यांच्या ध्यानात कायमचा राहिला आहे त्यामुळे आमदार श्री.कथोरे साहेबांकडे एखादा व्यक्ती १० वर्षांनी जरी गेला तरी त्यांची एकदाच नजर नाव,गाव, कामाबद्दल लक्षात असल्याचे सांगून जाते.

          मुरबाड विधानसभेत त्यांना तोड देणारा विरोधकच नाही.कारण आमदार श्री.कथोरे साहेबांच्या मागे लाखो जनसामान्यांचा आशिर्वाद कायमचा राहिल्याने साहेबांच्या मतांचा आकडा हा कमी झालेला नसून तो वाढतच गेला आहे. सर्वाधिक मते घेऊन विजयाची हॅट्रिक करणारे महाराष्ट्रातील तिसरे आमदार म्हणून आमदार श्री.किसनराव कथोरे आहेत. परंतु आमचे लाडके आमदार श्री. किसनराव कथोरे हे मंत्री केव्हा होणार अशी खंतच येथील तमाम जनतेला आहे,त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत हॅट्रिक ही कायमच असल्याने संकेत असल्याचे आमच्या साहेब,आप्पा,बाबांना विकासपर्वाच्या बादशहाला ठाणे जिल्ह्यातून मंत्री पद द्या अशी तमाम जनतेतून इच्छा व्यक्त होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post