BIG BREAKING NEWS...

एसएमबीटी हॉस्पिटल आणि ग्रामीण रूग्णालय मुरबाड यांचे संयुक्त विद्दयमाने उद्दया 8 तारखेला मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन

 

(दि.07,POL - कुणाल शेलार, मुरबाड)

महाराष्ट्रातील नाशिक जिल्हयातील घोटी येथिल नामवंत असलेले एसएमबीटी हॉस्पिटल हे सर्व सामान्य जनतेचे आधारवड बनले असून नागरिकांच्या उपचारासाठी तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती या हॉस्पिटलमध्ये असल्याने तमाम जनता या ठिकाणी आपल्या उपचारासाठी कौसो दूरून येत असतात.गाव खेडे पाडयात एसएमबीटी हॉस्पिटल पाहोचले असून मोफत आरोग्य तपासणी तसेच उपचार शिबीराचे प्रामुख्याने आयोजन केले जात आहे.या शिबीरात तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती असल्याने गंभीर आजारावर मात करण्यासाठी सल्ला व मार्गदर्शन केले जाते.अशाच शिबीराचे आयोजन मुरबाड ग्रामीण रूग्णालयात उद्दया दि.8 एप्रिल 2024 रोजी करण्यात येणार असून या शिबीरात शुगर,रक्तदाब,ब्लड ऑक्सिजन,तपासणी,इसीजी सल्यानुसार,तपासणी करण्यात येणार आहेत.त्याचबरोबर हृदयरोग,बालरोग,कान नाक घसा,मेडिसिन,सर्जरी,स्त्रीरोग अशा विविध उपचारावर तज्ञ डॉक्टरांकडून सल्ला देऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे.सदर एसएमबीटी हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेकांची जीव जाण्यापासून वाचले असून त्याची अनेक उदाहरणे नागरिकांनीच दिली आहेत.या हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतंर्गत मोफत उपचार व शस्त्रक्रिया होत असल्याने नागरिकांनीही एसएमबीटी हॉस्पिटलला आपली पसंती दाखविली आहे.याच हॉस्पिटलच्या व ग्रामीण रूग्णालय मुरबाड यांच्या संयुक्त विद्दयमाने मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन सोमवार दि 8 वेळ सकाळी 10:30 ते दुपारी 3:30 या वेळेत केले जाणार असून सर्व नागरिकांनी या शिबीरामध्ये उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी संजय गगे सर (9607800709),नितीन भोसले सर(8796428333) एसएमबीटी हॉस्पिटल समन्वयक यांच्याशी संपर्क करावा.

Post a Comment

Previous Post Next Post