मुरबाड विधानसभा मतदार संघात विकासाचे वादळ म्हणून सदैव चर्चेत असलेले महाराष्ट्राचे लाडके आमदार,व विकासाचे ढाण्या वाघ म्हणून ओळख असलेले आमदार किसनराव कथोरे यांनी त्यांच्या हॅट्रिक मारलेल्या आमदारकीमध्ये विविध अशी विकास कामे केली असून त्या कामांचा गाजावाजा संपूर्ण महाराष्ट्रात वाजला आहे. विकास निधी आणण्यामध्ये त्यांचा हात कोणीच पकडू शकत नाही.अशा ढाण्या वाघाने ठाणे जिल्ह्याचा कायापालट केला आहे.गेल्या १५ दिवसात विविध अशा पाठपुराव्याच्या कार्यांना गतिमान मंजुरी मिळाली असून त्यांच्या प्रत्येक कार्याची दखल राज्य सरकारने घेतली आहे. त्याचेच ज्वलंत उदाहरण म्हणजे पेंढरी धरण मंजुरी, टोकावडे ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय म्हणून मंजुरी यांसह अनेक पाठपुराव्याला यश प्राप्त झाले आहे.त्यातच मुरबाड ग्रामीण रुग्णालय/ट्रामा केअरला आता उपजिल्हा रुग्णालय म्हणून ५० बेडची मंजुरी मिळाली असून त्या संदर्भात १६ जुलै २०२४ रोजी शासनाने शासकीय परिपत्रक काढून ग्रामीण रुग्णालय मुरबाड उपजिल्हा रुग्णालय म्हणून मंजुरी दिली आहे यामुळे आमदार किसनराव कथोरे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.या परिपत्रकामध्ये विविध संदर्भीय बाबी नमूद असून सदरचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.टोकवडे ग्रामीण रुग्णालया बरोबर मुरबाड ग्रामीण रुग्णालय ही आता उपजिल्हा रुग्णालय म्हणून ओळखले जाणार आहे.ग्रामीण रुग्णालयामध्ये येणाऱ्या नागरिकांना चांगल्या प्रकारे आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक सिव्हिल सर्जन डॉ.कैलास पवार यांनी चांगल्या प्रकारे उपाययोजना आखल्याने त्यांचेही योगदान अमूल्य ठरले आहे.आमदार किसनराव कथोरे यांच्या अत्यंत जवळ असलेले सिव्हिल सर्जन डॉ.कैलास पवार यांच्या कार्यक्षेत्रातील असलेल्या रुग्णालयांचा विकास झपाट्याने होत असून आता विकास मात्र काही थांबत नाही.मुरबाड ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय मुख्य इमारत बांधकामाचे अंदाजपत्रक व प्रशासकीय मान्यता दिल्याने ३० खाटावरून ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.साधारणता इमारतीचे बांधकामाचे २९.३४ कोटी इतक्या किमतीच्या अंदाजपत्रक व आराखड्यांना प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता,त्यानुसार आमदार श्री.किसनराव कथोरे यांच्या पाठपुराव्यानंतर मुरबाड ग्रामीण रुग्णालय आता उपजिल्हा रुग्णालय म्हणून नव्या दूरदृष्टीत उभा राहणार आहे.यामध्ये तज्ञ डॉक्टर, परिचारिका,कर्मचारी स्टाफ यांची देखील नव्याने भरती होणार असल्याने नागरिकांच्या सेवेसी हा मुरबाड उपजिल्हा रुग्णालय ठाणे जिल्ह्यात प्रथम स्थानी असेल असा विश्वास येथील नागरिकांनी व्यक्त केला असून सर्व नागरिकांनी महाराष्ट्राचे लाडके आमदार श्री.किसनराव कथोरे व ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक सिव्हिल सर्जन डॉ.कैलास पवार यांचे आभार मानले आहे व त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
(दि.18,POL-कुणाल शेलार,मुरबाड)
Post a Comment