BIG BREAKING NEWS...

रेनबो सनराईस इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त संस्कृती जपणारा उत्सव साजरा...

(दि.22, POL, कुणाल शेलार, मुरबाड)

मुरबाड तालुक्यातील नामवंत असलेले एकमेव ISO नामांकित रेनबो सनराईस इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त भारतीय संस्कृती जपणारा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी तीन वर्षांपासूनचे ते दहावीपर्यंत विद्यार्थी विद्यार्थिनींनी टाळकरी वारकरी वेशभुषेत सहभाग नोंदवून पारंपारिक उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला.यावेळी या शाळेमध्ये छोटे वारकरी,टाळकरी यांनी खांद्यावर पालखी घेऊन भक्तीगीते गावून वाजत गाजत नाचत हा उत्सव दणकेबाज व शानदार पद्धतीत साजरा केला.या बहरदार उत्सवामध्ये एका विद्यार्थ्याने हुबेहूब श्रीविठ्ठलाची वेशभूषा साकारली तर एका विद्यार्थिनींनी रुक्मिणीची वेशभूषा साकारली.या उत्सव कार्यक्रमात टाळ,भजन, किर्तन अशा रूपरेषात हा आनंद उत्सव साजरा केला.यावेळी रेनबो सनराईस इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक तथा मुख्याध्यापक श्री.पंढरीनाथ टोले सर यांनी सदर उत्सवाचे नियोजन आखून विद्यार्थ्यांच्या मनात भारतीय संस्कृती निर्माण केली.संस्कृती हा आपल्या जीवनाचा आरसा असून ते जपणे आपले कर्तव्य आहे.आपण ही संस्कृती जपतो याचा स्वाभिमान आणि अभिमान आपण बाळगलाच पाहिजे अशी विचारधारा यावेळी मुख्याध्यापक श्री.टोले सरांनी आपले विचार मनोगतात मांडले. या उत्सवाला सर्व शिक्षक, कर्मचारी,स्टाफ,शिपाई यांचा सहभाग असल्याचे यावेळी दिसून आले.यावेळी मोठ्या थाटामाटात हा पारंपारीक उत्सव साजरा करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post