BIG BREAKING NEWS...

रव्याच्या आळया प्रकरण ; मुरबाडच्या पटेल मार्टची तक्रार मंत्रलायच्या दालनात ; पत्रकार कुणाल शेलार यांनी केली पटेल मार्टच्या परवानगी रद्दची मागणी

 

(दि.17,POL - कुणाल शेलार,मुरबाड)

मुरबाड पटेल मार्टमधून तक्रारदार पांडूरंग मेंगाळ यांनी गणपती सणात जाडा रवा खरेदी केले होते त्यामध्ये एक्सपायर डेट अगोदरच आळया आढळल्याची बातमी दोन दिवसांपूर्वी प्रथम आमच्या प्रसिध्दी माध्यमातून प्रसिध्द करण्यात आली होती त्यानंतर त्याबाबत सर्वत्र आळयांचा प्रकरण घुमु लागले असता सदर प्रकरणात पटेल मार्ट यांचे परवाना रद्द करून एफएसएसएआय यांच्या नियम अटी धरून असलेल्या सर्व लॅब इनिस्पेक्शनची चौकशी मंत्रालय पथक नेमुन कारवार्इ व्हावी म्हणून पत्रकार कुणाल शेलार यांनी थेट मुख्यमंत्री,अन्न व औषधी द्रव्ये प्रशासन विभाग,कोकण आयुक्त,ठाणे जिल्हाधिकारी यांच्यासह अन्य विभागाला पत्रव्यवहार करून मागणी केली आहे.जर एक्सपायर डेटच्या अगोदर एखादी वस्तु खराब होऊ शकते तर त्यावर संबंधित विभाग कशा पध्दतीने नियंत्रण ठेवत असेल असा प्रश्‍न गांभिर्यपूर्वक उभा राहत असून नकळत हीच वस्तु खाल्ली असता त्याचे परिणाम ग्राहकांच्या आरोग्याला हानिकारक होऊन जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.तक्रारदार यांनी व्यवस्थापकीय यांना सदरची घडलेली घटना समोर आणून दिल्यास तुमचा रवा बदलून देतो अशा आशयाखाली सदर विषयावर पाणी घालण्याचे काम केले परंतु श्री.मेंगाळ यांनी त्यांना खत न घालता त्यांना या प्रकरणात दुजोरा दिला त्यानंतर त्यांनी सर्वप्रथम ती रव्याची पिशवी जी पुरावा स्वरूपात आहे ती पत्रकार कुणाल शेलार यांना प्रत्येक्ष भेटुन त्यांना देऊन आपण माझी तक्रार नोंदवून घेऊन आपल्या प्रसिध्दी माध्यमातून बातमी प्रसिध्दी करून अन्न व औषधी द्रव्ये प्रशासन विभाग यांना कारवार्इ करण्याबाबत मला मदत करावी अशी विनंती केली असता याची दखल पत्रकार कुणाल शेलार यांनी तत्काळ घेऊन बातमी प्रसिध्दी केली त्यानंतर बातमी प्रसारित होताच दुसरे तक्रारदार विकास उपाध्ये यांनी पुन्हा याच पटेल मार्टमधुन कोल्हापुरी ठेचा घेतले असता उलटी झाली असल्याचे सांगुन त्याबाबत छायाचित्र देत वरील त्याच प्रकाराची गाथा सांगितली.


त्यानुसार नेमकी पटेल मार्टमधील वस्तु कुठे व कशापध्दतीने इनिस्पेक्शन करून विकल्या जातात याबाबत चौकशी होणं गरजेचे असून सर्वप्रथम पटेल मार्टच्या एफएफएसएआयच्या छापील त्या पुडयात एक्सपायर तारखेअगोदरच आळया भेटल्याने त्यांचे ग्राहकांना चांगले खाद्दय वस्तु विक्री करतांना दुर्लक्ष झाले हे मात्र निश्‍चितच असून त्यांचे स्वतःच्या एफएफएसएआयचे लायसन्स रद्द करावे व मुरबाड नगरपंचायतीकडुनही त्यांचे परवाना रद्द करावे अशी मागणी मंत्रालयासह संबंधित विभागाच्या दालनात पत्रान्वये केली आहे त्याचबरोबर मुरबाडच्या पटेल मार्टवर कारवार्इ न झाल्यास उपोषणाची तारिख ठरवून आमरण उपोषणाचा इशारा पत्रकार कुणाल शेलार यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्यासह संबंधित विभाग अधिकारी यांना दिला आहे. (उर्वरित पुढील भागात…)

Post a Comment

Previous Post Next Post