दि,02,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
गेल्या अनेक वर्षापासून आपणांस परिचित असलेले निस्वार्थपणाने रूग्णांना सेवा देणारे तसेच आपल्या जीवाची पर्वा न करणारे 2 योध्दा म्हणजे 102 अॅम्ब्युलन्स चालविणारे तानाजी (भाऊ) भोईर व भाऊ हरड.कोणताही रूग्ण रूग्णालयात आल्यावर प्रथम दोन्ही भाऊंचे नाव घेत त्यांचा शोध घेत असताना पाहिलं आहे.अनेक वर्षापासून जबाबदारीने आपली कामे सांभाळत असताना हजारो नागरिकांची मने त्यांनी जिंकून घेतली आहेत.महत्वाचं म्हणजे ग्रामीण भागातुन महिलांची प्रसुती सुरूळीत व्हावी म्हणून एका फोनवर 102 ची अॅम्ब्युलन्स दारात हजर असते इतकेच नव्हे तर प्रसुती झाल्यावरही त्यांना सोडण्यासाठी त्यांनी कधी दिरंगाई केली नाही.सदैव माणूसकी झरी जपणारे तानाजी (भाऊ) भोईर व भाऊ हरड यांच्या कौतुकीची थाप वरिष्ठांनी पाठिवर मारली आहे.आजही ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व मुरबाड ग्रामीण रूग्णालयाचे नेत्रशल्यचिकित्सक तथा वैद्दयकीय अधिक्षक डॉ.संग्राम डांगे यांच्या सहकार्याने ग्रामीण भागात रूग्णांना सेवा मिळत असून धडाडीचे कार्य करणारे 2 योध्दा तानाजी (भाऊ) भोईर व भाऊ हरड यांना कोरोना काळात कोरोना योध्दा म्हणून पुरस्कृत करण्यात आले.प्रत्येक माणसाच्या मनात कौटूंबिक स्थान निर्माण करून आपल्या कर्तव्यात कधीही कसुरता आणू दिली नाही.वेळोवेळी 24 तासाची सेवा देण्यात त्यांनी उच्चांक गाठून ग्रामीण रूग्णालय मुरबाडचे नावलौकिक करून जनमाणसांत शासनाची पारदर्शक प्रतिमा निर्माण करून दिली आहे.अतिशय गंभीर रूग्णाला पुढील उपचाराकरिता नेत असतांना 102 ची अॅम्ब्युलन्स त्यांच्या हातात दिल्याने रफ्तार पकडून अनेकांचे जीव त्यांनी वाचविले आहे.कधीही कुठलीही अपेक्षा न बाळगता नैतिकता जोपासणारे हे 2 योध्दांची नाळ प्रत्येक नागरिकांशी जोडली आहे.अशाच कर्तव्यपरायण कार्य करत असतांना आजही 102 या नंबरवर फोन केल्यास तानाजी (भाऊ) भोईर व भाऊ हरड हे 2 योध्दा सेवा देण्यासाठी तत्पर असल्याचे पाहायला मिळत आहे.
Post a Comment