(दि.14,POL - मुरबाड)
आजचे युग
स्पर्धेचे युग असून इथे प्रतिस्पर्धी तयार होतांना दिसत आहेत अशाच प्रतिस्पर्धीची लाट
लहान किरकोळ दुकानापासून ते थेट मोठ मोठे मॉल मार्ट पर्यंत पाहोचली आहे.बाय वन गेट वन फ्री ऑफर नागरिकांना वस्तु खरेदी करण्याकरिता भुरळ पाडत आहे
अशातच घरगुतीकरिता असलेल्या वस्तुमध्ये ऑफर नागरिकांना प्रदर्शित करित आहे.परंतु या प्रदर्शितीत मॉल मार्ट मालकांनी पैसे कमविण्याकडे लक्ष केंद्रित केल्याने
वस्तु विक्री होत असताना वस्तुकडे दुर्लक्ष केले असल्याचे भयावह घटना मुरबाड मधून सांगुन
जात आहे.
मुरबाड शहरात मॉल मार्ट यांनी मुरबाडकरांना आपल्याकडे खरेदी करण्यासाठी जाहिरात बाजी करतांना धमाकेदार ऑफरची प्रसिध्द केली असता या ऑफरनी मुरबाडकरांची ओढ त्यांच्याकडे खेचण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे परंतु असे होत असताना तो प्रयत्न कालांतराने फेल जातो,नागरिकांचा असलेला विश्वास तुटला जातो,आपली फसवणूक केली असा प्रश्न नागरिकांच्या मनात उभा राहतो असाच प्रश्न मुरबाडचे स्थानिक रहिवासी पांडुरंग महादु मेंगाळ यांना पडला असता चक्क त्यांनी गणपती सणात खरेदी केलेल्या घरगुती साहित्यातील रव्यात आळयांचा बोनस मुरबाडच्या पटेल मार्टनी दिला आहे.पांडुरंग मेंगाळ यांनी गणपती सणात पटेल मार्ट या मॉल मधुन साहित्य जीवनावश्यक वस्तुची खरेदी केली होती त्यामध्ये रव्याचा समावेश होता त्या जाडा रव्याची एक्सपायर डेट 08/10/2024 रोजीची असून त्या अगोदरच आळया असल्याचे निदर्शनास आले.एक्सपायर डेट लांब असतानाही त्या अगोदर ती वस्तु खराब होणं शक्य नसते हे श्री.मेंगाळ यांना माहिती आहे.खरेदी करून आणलेला रवा घरीच ठेवला.जाडा रव्याला 6 ते 7 दिवसानंतर पाहिल्यास त्यामध्ये आळयांनी नातेवार्इक परिवार निर्माण केले होते.पटेल मार्ट मॉलनी रव्यातुनच आळया बोनस म्हणून दिले आहे.याबाबत सदरची माहिती व जाडा रव्यात असलेल्या पेटी पॅक पुडा घेऊन आमच्याशी संपर्क साधले असता सविस्तर माहिती समोर उघड झालेली आहे.
रव्याची एक्सपायर तारिख पुढिल महिण्याची असताना व एफएसएसएआय पाकीटावर दर्शविली असताना त्या अगोदर आळे येणं शक्य आहे का असा प्रश्न उभा राहत असुन याकडे आता मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,अन्न व औषध प्रशासन विभाग मंत्रालय,ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय,आरोग्य विभाग तसेच एफएसएसएआय कंपनीने लक्ष वेधावे अशी मागणी पत्रकार कुणाल शेलार यांनी केली असुन मुरबाड नगरपंचायतीकडून सदर मॉल सुरू करण्याकरिता परवानगी घेतली असल्यास ते परवाने रद्द करून तत्काळ चौकशी करून कारवार्इ करावी अशी मागणी कुणाल शेलार यांनी केली आहे.सदर आळया विक्री खाद्दय वस्तुमध्ये तयार होणं व ते नकळत खाणं म्हणजे नागरिकांच्या आरोग्यासह जीवाला धोका निर्माण होऊ शकतो यात शंका नसून पटेल मार्ट यांनी छापील एफएसएसएआय प्रमाणित लायसन्स तसेच वस्तु कशा पध्दतीने नागरिकांना विक्री केली,जाते याची चौकशी तत्काळ व्हावी चौकशी तत्काळ न झाल्यास उपोषणाचा इशारा छेडण्यात येर्इल असा इशारा पत्रकार कुणाल शेलार यांनी दिले असून लवकरच मंत्रालयासह संबंधित विभागाला पत्र करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
(भाग - 1,उर्वरित पुढील
भागात)
Post a Comment