दि.12,POL,कुणाल शेलार,मुरबाड
अलीकडे अपघाताचे प्रमाण वाढले असून वाहतुक नियमांचे पालन न केल्याने अनुकुचित प्रकार घडत असल्याचे आपल्याला ऐकायला व पहायला मिळत आहे.कमी वयात गाडी हातात घेऊन स्टार्इल पध्दतीने ओवरटेक करतांना कित्येक तरून दिसत आहेत,विना हेल्मेट,सिटबेल्ट न लावता,दारू पिऊन गाडी चालवित असून नियमांचे उल्लंघन केले जात असून पोलीस यंत्रणा अशांना अनेक वेळा समज देऊन त्यांना नियमांची आठवण करून देतात तर काही वेळा तर दंडात्मक कारवार्इ देखील केली जाते तरी नियमांचे पालन वाहनचालक करित नाही त्यावरच आधारित पुन्हा एक नवे गीत सध्या युटयुब सोशल मिडीयावर वायरल होत आहे.
या गाण्यातुन सर्व प्रवासी वाहन चालकांना सुंदर असा संदेश देण्यात आले असून जीवन अनमोल आहे त्यामुळे नियम पाळल्यास जीवनाचा प्रवास सुखरूप होर्इल,दुर्घटनासे देर भली,गाडी चलाते रस्तेपर तुम नियम को जान लो असे आहे.या गाण्याचे गायक संकल्पना व संगीतकार स्वतः वाहतुक पोलीस महामार्ग माळशेज घाटाचे श्री.संजयजी घुडे आहेत.
त्यांच्या या
गाण्यातुन अनेकांपर्यंत नियमांचे पालन कसे करायला हवं असा संदेश सर्वांपर्यंत
गेलेला आहे.माळशेज घाटात पहिले अपघाताचे प्रमाण मोठया प्रमाणात होते परंतु वाहतुक
पोलीस महामार्ग माळशेज घाटातील पोलीस प्रशासनानी आपल्या खबरदारी व जबाबदारीने या
अपघातात प्रमाण कमी झाल्याचे आता पाहायला मिळत आहे.यामध्ये सध्या या पोलीस ठाण्यात
कार्यरत असलेले श्री.अनिल विसपुते (सहाय्यक पोलीस निरीक्षक),या
गाण्याचे गायक तसेच वाहतुक पोलीस श्री.संजय घुडे(मेजर),श्री.प्रविण
गायकवाड(मेजर),श्री.राजेंद्र रसाळ(मेजर),श्री.कैलास कोकाटे(मेजर),श्री.शरद पाखरे(मेजर) यांसह
सर्वच पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी विशेष मोहीमेद्वारेही जनजागृती केली आहे.
वाहतुक
पोलीस श्री.संजय घुडे मेजर असून त्यांना गायनात मोठी आवड आहे.अनेक वेळा त्यांचे
किर्तन,भक्तगिते चर्चेत आले आहे.त्यांचे नवे गीत " जीवन बचाव,जीवन अनमोल है भय्या " महाराष्ट्रात सध्या गाजत असून मोठया प्रमाणात
नागरिक,त्यांच्या चाहत्यांकडून या गाण्याला पसंती मिळत असून
सध्या गाणं टे्रडींगमध्ये आहे.
-------------------------------------------------------------------
( https://youtu.be/ToU5r8roFLA?si=w3bwWj8FrYEHziMB -मार्ग सुरक्षा - जीवन बचाव | जीवन अनमोल है भय्या | Jivan anmol he )
-------------------------------------------------------------------
Post a Comment