BIG BREAKING NEWS...

न्यु इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्दयालय मुरबाड येथे युवा महोत्सव व वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण सोहळा 2025 साजरा...

 

दि.13,POL,कुणाल शेलार,मुरबाड

दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त मुरबाड तालुका शिक्षण संस्था संचलित,न्यु इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्दयालय मुरबाड येथे युवा महोत्सव व स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण सोहळा 2025 साजरा करण्यात आले.

या कार्यक्रमाची सुरूवात दिपज्वलनानी केली.यावेळी प्रमुख मान्यवर यांचे पुष्पगुच्छ देत सहर्ष स्वागत करण्यात आले.या युवा महोत्सवात शालेय विद्दयार्थ्यांनी आपल्या वर्कृत्व स्पर्धेत सहभाग घेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विचार शैली व ज्ञान सागरावर भाषण सादर केले.

तसेच आपले आर्इ वडील अपार कष्ट करून आपल्या शिकविण्यासाठी अहोरात्र मेहनत करतात आणि आजच्या तरूण युवकांचे विचार,सोशल मिडीयाबरोबर मोबार्इलची लागलेली सवय,तरूण पिढींची चूकीची दिशेची होणारी दशा,यांसह अन्य विषयावर भाषण करित राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना विनम्रपणे अभिवादन केले.त्याचबरोबर आपल्या देशाचे सांस्कृतिक वारसा म्हणून भक्तगिते,देवी दैवत,अभंग,गवळण 11 वी व 12 वीच्या विद्दयार्थ्यांनींनी आपल्या मधुर सुरात सादर केली तर पारंपारिक नृत्यही यावेळी सादर करून एकच जल्लोष विद्दयार्थ्यांनी साजरा केला.

आर्इ एकविरा या गाण्यासह थांब थांब कासारा,बाया भुकल्यानं ग,गोधंळाला ये,वेसावची पारू यांसह अन्य गाण्यावर विद्दयार्थ्यांनी नृत्य सादर करून मान्यवरांनीही त्यांच्या अंगी शिक्षणाबरोबर पारंपारिक नृत्याचा वारसा जपत असल्याचे कौतुक केले.या स्नेहसंमेलात चित्रकला स्पर्धेसह रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असता विद्दयार्थी व विद्दयार्थीनींनी सुंदर अशी रांगोळी काढून मुली महिलांवरील अत्याचार शासनाने कडक नियम लागू करून संरक्षण मिळावे असा संदेशच दिला आहे.तसेच या स्नेहसंमेलनात विद्दयार्थ्यांनी खाऊ गल्ली म्हणून दुकानाचे स्टॉल लावले होते व खेळातील विद्दयार्थ्यांना पारितोषिक देऊन त्यांच्या कलागुणांचे अभिनंदन करण्यात आले.या कार्यक्रमाला मुरबाड तालुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमदार श्री.किसन कथोरे यांना काही कारणास्तव या कार्यक्रमात न आल्याने सर्व विद्दयार्थ्यांना त्यांनी शिक्षकांच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून सचिव श्री.किसनजी चौधरी सर,श्री.मोहनीशदादा तेलवणे,श्री.चंद्रमोहन दुगाडे,श्री.भास्कर खंडागळे,श्री.प्रसाद पोतदार,श्री.स्नेहल शहा,महाविद्दयालयाचे प्राचार्य श्री.राकेश पाडवी सर,उपप्राचार्य श्री.जयवंत कराळे सर,श्री.बडगुजर सर(परिक्षक),श्री.भालेराव सर(परिक्षक) उपस्थित होते तर वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री.अरूण गोंधळी सर,श्री.माळवदे सर,श्री.खंडागळे सर,श्री.भालेराव सर,श्री.माने सर,श्री.शेळके सर,सौ.निपुर्ते मॅडम,सौ.नम्रता मोहपे मॅडम,सौ.मनिषा पठारे मॅडम,सौ.बोटकुंडले मॅडम यांनी विशेष मेहनत घेतली.

वैशिष्टय म्हणजे विद्दयार्थीनींनी घेतलेल्या पारंपारिक नृत्याच्या गाण्याची संकल्पना व निवड सौ.नम्रता मोहपे मॅडम,सौ.मनिषा पठारे मॅडम,यांनी ठरवून दिल्याने या स्नेहसंमेलनाला जल्लोषाची वेगळीच रूपरेषा साकारली असल्याचे यावेळी पाहायला मिळाले.विद्दयार्थ्यांनीही शिक्षकांच्या नियमांचे पालन केले असून या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.देशमुख सर यांनी केले.

 

 

Post a Comment

Previous Post Next Post