BIG BREAKING NEWS...

स्वच्छता दुतांची मुरबाड शहरात स्वच्छता अभियानाला केली सुरूवात ; सर्वत्र प्रशंसेसह कौतुकाचा वर्षाव

 

दि.19,POL,कुणाल शेलार,मुरबाड

मुरबाड शहराची भौगालिक रचना पाहिली असता काही ठिकाणी अस्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे याच अस्वच्छतेकडे मुरबाड शहरवासीयांनी स्वच्छता अभियान मोहीम हाती घेत तमाम नागरिकांना आपल्या प्रभागासह शहरात स्वच्छता राखावी असा संदेश दिला आहे.

या राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मुरबाड पोलीस ठाणे येथिल परिसरात करण्यात आली.या स्वच्छता अभियान मोहिमेत मॉडर्न इंग्लिश मिडीयम स्कूलचे शिक्षक व विद्दयार्थी यांच्यासह नगरपंचायत आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी आपला सहभाग नोंदविला त्याचबरोबर या प्रंशसीय उपक्रम मोहिमेत मुरबाड शहरातील निलेश गायकर,प्रकाश गायकर,रूपेश गुजरे,मुकेश ठाकरे,विनोद मोरे,प्रदिप मिश्रा सर,महेश देशमुख,रघुनाथ गायकर यांच्यासह अन्य स्वच्छतादुत प्रामुख्याने उपस्थित राहिले.

प्रथम सर्व स्वछतादुतांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करित या मोहिमेची मुरबाड स्वच्छता अभियानाची सर्वानुमते घोषणा करण्यात आली.मुरबाड शहरातील अस्वच्छता असलेल्या ठिकाणी ही स्वच्छता मोहिम अभियान लवकरच प्रस्थान करून स्वच्छता राबविण्यात येणार असल्याचे लवकरच सर्वांना अवगत केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या स्वच्छता अभियान मोहिमेला मोठया उत्साहाने सुरूवात केली असून यामध्ये सामील झालेल्या विद्दयार्थी,सहकारी,प्रशासन अधिकारी कर्मचारी या स्वच्छतादुतांचे आभारही यावेळी मानण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post