दि.30,POL,कुणाल शेलार,मुरबाड
अनेकांना टिबी सारखे आजार असतात त्याची लागण कुटूंबातील सदस्यांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शासनाने नविन टेस्ट सुरू केली असून या टेस्टचं नाव सीवाय टिबी टेस्ट आहे.या टेस्टच्या माध्यमातुन आता कुटूंबातील सर्व सदस्यांची टेस्ट केली जाणार असून टिबी सारख्या आजारावर मात केली जाणार आहे.सदरच्या निदानात पॉझिटीव्ह आढळुन आल्यास त्यावर तात्काळ उपचारासह गोळया औषधे देण्यात येणार आहे.
सीवाय टिबी टेस्ट निदान उपचार मुरबाड ग्रामीण रूग्णालयातुन सुरू करण्यात आले असून सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने तसेच ठाणे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.आशा मुंजाळ व ठाणे जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार यांच्या पाठपुराव्यासह मार्गदर्शनपर सहकार्याने त्याचबरोबर मुरबाड ग्रामीण रूग्णालयाचे नेत्रशल्यचिकित्सक तथा वैद्दयकिय अधिक्षीक डॉ.संग्राम डांगे यांच्या अधिपत्याखाली ही नविन टेस्ट सुविधा सुरू आहे.सदर या सीवाय टिबी टेस्ट निदानाचे उपचार टिबी विभाग प्रमुख डॉ.संतोष देसाई,डॉ.योगेश साळुंखे यांनी सदर गावोगावी जाऊन सर्व्हे करून करण्यास घेतली असून ग्रामीण रूग्णालयातही टिबी आजारावरील रूग्णांना आता दर मंगळवारी व गुरूवारी ओपीडी वेळात उपचार करून औषधे देण्यात येणार आहे त्यामुळे टिबी सारख्या आजारावरील रूग्णांना बरं होणाचा काळ अल्प दिवसांचाच असणार आहे.
या नविन सीवाय
टिबी टेस्टची सेवा ग्रामीण भागात जलदगतीने सर्व्हे द्वारे पाहोचत असून ज्यांना टिबी
सारखे आजार आहे त्यांना आता काळजी करायची गरज नसणार आहे त्यामुळे ज्यांना टिबी लक्षणं
आढळून आल्यास तात्काळ मुरबाड ग्रामीण रूग्णालयाशी संपर्क साधून सीवाय टिबी टेस्ट निदान
करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले असून सदर आजारावरील गोळया औषधे गोळया मोफत उपलब्ध
आहेत.टिबी विभाग प्रमुख डॉ.संतोष देसाई,डॉ.योगेश साळुंखे यांनी नागरिकांच्या आरोग्याची काळजी
घेण्याची मोठी जबाबदारी सांभाळली तालुक्यातील गाव खेडे पाडयात टिबी रूग्णांना बरं करण्याची
मोहीमच हाती घेतली असून त्यांच्या या धाडसी कार्याचे कौतुक करण्यात येत आहे.
Post a Comment