BIG BREAKING NEWS...

संतोष (बाबु) चौधरी यांची मुरबाड नगरपंचायत नराध्यक्षपदी निवड...

 

दि,13,POL,कुणाल शेलार,मुरबाड -

गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात ज्यांचा हतखंडा राहिला आहे,ज्यांनी कोरोना कालावधीत आपल्या जनतेला वार्‍यावर सोडले नाही,ज्यांनी नेहमी जनतेच्या सेवेचे विचार केले अन जे कधीही चूकीला साथ न देता सत्याचा जयघोष करित राहिले त्याचबरोबर कमी कालावधीतच ज्यांनी जनतेच्या मनात आपले कौटूंबिक स्थान निर्माण केले,आमदार किसनराव कथोरे यांच्या अत्यंत जवळचे असलेले संतोष (बाबु) चौधरी यांची मुरबाड नगरपंचायत नराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.श्री.चौधरी हे वार्ड क्र.13 चे नगरसेवक असून मुरबाड नगरपंचायतीचे आतापर्यंत 9 नगराध्यक्ष झाले असून श्री.चौधरी हे 10 वे नगराध्यक्षपदी विराजमान झाले आहे.मा.नगराध्यक्ष मुकेश विशे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त असलेल्या पदावर ठाणे जिल्हाधिकारी श्री.अशोक शिनगारे यांनी निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केला आहे.या पदासाठी संतोष (बाबु) दिलीप चौधरी यांची नगराध्यक्षपदासाठी नामनिर्देशन पत्र निवडणूक अधिकारी तथा मुरबाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री.मनोज म्हसे यांच्याकडे सादर केले आहेत.यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी केवळ एकच नामनिर्देशन उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने हे तर मात्र निश्‍चितच झाले की संतोष (बाबु) चौधरी यांची नगराध्यक्षपदी निवड झाली आहे परंतु 11 फेब्रुवारी ते 13 असे नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाले असून प्रत्यक्ष निवडणूक घेणे व निकाल नियमानुसार घोषित करणे असल्याने सदर निवडणूक बिनविरोध असल्याने श्री.बाबु चौधरी हे नगराध्यक्षपदी निवड झाले असल्याचे जनतेच्या भावना अभिनंदन वर्षावातून समोर आल्या आहेत.

          संतोष (बाबु) चौधरी हे नगरसेवक असताना सर्वांनी त्यांच्या समाजसेवी कार्याला जवळून पाहिले आहेत.प्रत्येक कार्यात त्यांचा असलेला सहवास आणि प्रत्येक दिवाळी सणात प्रत्येक घरात दिवाळी सणाचे साहित्य किट,प्रत्येक धार्मीक कार्याला हातभार,रूग्णालय असो की मोठ मोठे हॉस्पिटल त्याठिकाणी सर्वसामान्य जनतेच्या मदतीला धाऊन जाणारा एकच नाव म्हणजे संतोष (बाबु) चौधरी.नेहमी दुसर्‍यांचा विचार करणारे संतोष (बाबु) चौधरी यांनी कधीही स्वार्थ बाळगला नाही.नेहमी हसरा चेहरा घेऊन कालपेक्षा आज काही तरी जनतेसाठी वेगळं करूया अशी मनोभावना ठेवणारा जनसेवक आज नगराध्यक्षपदी विराजमान झाल्याने जनतेकरिता सत्कर्म कार्य निश्‍चित त्यांच्या हातून घडणार यात शंका नाहीच.

          संतोष (बाबु) चौधरी यांचे वडील श्री.दिलीप चौधरी यांनी देखील समाजकार्य केले असून त्यांच्या समाजसेवी वारसाला पुढे नेण्याकरिता जनतेमधील नैतिकता बाळगणारे संतोष (बाबु) चौधरी आज याच वारसा जोपासून नगराध्यक्षपदी विराजमान झाल्याने मुरबाड शहरात आनंदाचा वर्षाव पसरला आहे.सुखःत तर सर्वच असतात परंतु दुखःत शेकडोमध्ये एकच असतो असा एक असलेला आकडा म्हणजे संतोष (बाबु) चौधरी.नेहमी प्रत्येक कार्यात एक नंबरवर असलेला कार्यकर्ता आज नगराध्यक्षपदी विराजमान झाल्याने कौतुकाची थाप त्यांच्या पाठिवर सदैव मुरबाड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार किसनराव कथोरे यांनी मारली असून आज त्यांच्या आशिर्वादाने श्री.बाबु चौधरी 10 व्या नगराध्यक्षपदावर विराजमान होतांना दिसले आहेत.शुन्यातुन उभारी घेत आज नंबर एकवर काम करणारे संतोष (बाबु) चौधरी यांनी एक नंबरामागे शुन्य लावून 10 वा आकडा प्राप्त केलाच अन 10 व्या नगराध्यक्षपदी ते विराजमान झालेच.मुरबाड नगरपंचायतीवर आमदार किसनराव कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपची सन 2015 सालापासून निर्विवाद वर्चस्व असल्याने मुरबाड नगरपंचायतीमध्ये विकासात्मक बदल झाल्याचे दिसून येत आहे.मुरबाड शहाराच्या प्रत्येक वार्डातून हायवेला जाणारा रस्ता काँक्रेटीकरण झाले,शुध्दपाणी मिळू लागले,स्टे्रट लाटीने शहर प्रकाशमय झाले इतकेच नव्हे राज्याच्या सर्वच नगरपंचायतीमध्ये मुरबाड नगरपंचायतीने 1 नंबर पटकाविले आहे.याच मुरबाड नगरपंचायतीमध्ये विकास करण्याकरिता आमदार श्री.कथोरे यांच्या माध्यमातून करोडो रूपये निधी विकासाकरिता प्राप्त झाले असून 9 नगराध्यक्ष कालावधीत हा विकास झपाटयाने झाले असून 10 व्या स्थानी विराजमान झालेले नवनिर्वाचित नगराध्यक्ष संतोष (बाबु) चौधरी यांच्या हातून ती विकास करण्याची गती आणखी दुपटीने प्राप्त होल यासह नगराध्यक्षपदी विराजमान झाल्याने शुभेच्छा येथील जनतेनी त्यांना दिले आहे.संतोष (बाबु) दिलीप चौधरी यांचे नामनिर्देशन उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता या प्रसंगी टीडीसी बँकेचे संचालक राजेश पाटील,उपनगराध्यक्षा सौ.मानसीता मनोज देसले,माजी नगराध्यक्ष किसन अनंत कथोरे, माजी नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे, माजी नगराध्यक्ष मोहन सासे, माजी नगराध्यक्ष मुकेश विशे,भाजपाचे जयवंत कराळे सर,नगरसेवक विकास वारघडे,नगरसेविका नम्रताता नंदकुमार जाधव यांसह अन्य नगरसेविका नगरसेवक,पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post