BIG BREAKING NEWS...

मुरबाड ग्रामीण रूग्णालयात संतशिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती साजरी...

 

दि,13,POL,कुणाल शेलार,मुरबाड -

मुरबाड ग्रामीण रूग्णालय येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमात संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या कार्याला व विचारांना उजाळा देण्यात आले असून मानवता हाच खरा धर्म यांची शिकवण देणारे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या विचारांचा वारसा पुढे अविरत प्रवाहीत राहावा या उद्देशाने संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती साजरी केली.

    यावेळी मुरबाड ग्रामीण रूग्णालयाचे नेत्रशल्यचिकित्सक तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ.श्री.संग्राम डांगे,श्री.माणिक गायकवाड(कार्यालयीन अधीक्षक), डॉ.सुतार,डॉ.पटेल,डॉ.साबळे, डॉ.विश्‍वकर्मा व सर्व कर्मचारी वर्ग असे उपस्थित होते.

 

Post a Comment

Previous Post Next Post