BIG BREAKING NEWS...

मुरबाड ग्रामीण रूग्णालयात आता अपंगांना दाखले वाटप सुरू ; तालुक्याबाहेर जाणारी पायपीट आता थांबली...

 

दि,03,POL,कुणाल शेलार,मुरबाड -

मुरबाड ग्रामीण रूग्णालयात विविध सुविधा आता उपलब्ध झाल्या असून नागरिकांना या सुविधांचा लाभ मिळण्यासाठी कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांचे पाठपुरावे इतिहासात नोंद होणारी साक्ष सांगून जात आहे.गेल्या अनेक वर्षापासून ग्रामीण रूग्णालयाची कायापालट होतांना दिसले आहे.या कायापालट मध्ये आमदार श्री.कथोरे यांच्या अथक प्रयत्नाने व जिल्हा शल्यचिकित्सक ठाणे डॉ.कैलास पवार यांच्या सहकार्याने उपजिल्हा रूग्णालयाला मंजूरी मिळाली असून याबाबत शासनाचे परिपत्रक देखील जाहीर झाले आहे त्यामुळे लवकरच मुरबाड ग्रामीण रूग्णालय आता उपजिल्हा रूग्णालय म्हणून ओळखली जाणार आहे.या उपजिल्हयाचे कामकाज जलदगतीने सुरू असून सध्या मुरबाड ग्रामीण रूग्णालयात डॉक्टरांची अधिपरिचारिका,कर्मचारी यांची मेहनत नागरिकांच्या सेवेसी तत्पर असल्याचे पाहायला दिसत आहे.एमबीबीएस डॉ.अनिल पटेल,डॉ.विश्‍वकर्मा,डॉ.साबळे यांच्यासह अन्य डॉक्टर यांनी 24 तास रूग्णांना सेवा मिळावी म्हणून डोळयात तेल घालून आपली जबाबदारी सांभाळतांना अनेकांना दिसले आहे.त्यातच नेत्रशल्यचिकित्सक तथा वैद्दयकीय अधिक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी मुरबाडच्या अपंग व्यक्तींची तालुका सोडून जिल्हयाच्या मुख्यठिकाणीची पायपीट होऊ नये म्हणून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड ग्रामीण रूग्णालयातच आता अपंगांना दाखले वाटप सुरू केले आहे.दि.01/02/2022 पासून या रूग्णालयात हँडीकॅप रूग्णांना दाखले मिळण्यास सुरूवात झाली असून सन 2024 सालापर्यंत एकूण 592 अपंग व्यक्तींना दाखले देण्यात आले आहे तर दि.30/08/2024 रोजी एकूण 287 अपंग रूग्णांना दाखले वाटप करण्यात आले आहे.जेव्हापासून डॉ.संग्राम डांगे यांनी पदभार स्विकारले तेव्हापासून ते आजरोजी पर्यंत यामध्ये शारिरीक अस्थिव्यंग - 182,अल्पदृष्टी- 35,कर्ण - 04,मतिमंद - 07 असे एकूण 231 तर मार्च महिण्यात शारिरीक अस्थिव्यंग - 08,अल्पदृष्टी - 07 तसेच एप्रिल महिण्यात अल्पदृष्टी - 03,शारिरीक अस्थिव्यंग - 04 अशा अपंग व्यक्तींना दाखले वाटप करण्यात आले.मुरबाड तालुक्यातील हँडीकॅप व्यक्तींना सदर दाखले देतांना रितसर तपासण्या करूनच दाखले देण्यात येत आहे आणि यावेळी स्वतः डॉ.डांगे व डॉ.विश्‍वकर्मा हे दर गुरूवारी उपस्थित राहून दाखले वाटप करित आहे त्यामुळे असे अपंग व्यक्ती ज्यांनी दाखले अद्दयापतरी काढून घेतले नसतील त्यांनी दर गुरूवारी ओपीडी वेळेत उपस्थित राहून तपासणी करून दाखले मिळवून घ्यावेत असे आवाहन नेत्रशल्यचिकित्सक तथा वैद्दयकीय अधिक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी केले आहे.

 

 

Post a Comment

Previous Post Next Post