दि,08,POL, कुणाल शेलार,मुरबाड –
मुरबाड तालुक्यातील सासणे
गावातील प्रकाश लक्ष्मण जाधव हे वयाच्या 58 व्या वर्षी 12 वी उच्च माध्यमिक परिक्षेसाठी
बसले असता ते उत्तीर्ण झाले आहे.मुरबाड तालुक्यातील नामवंत असलेले तसेच ज्येष्ठ म्हणून
कर्तृत्वान म्हणून एक धडाडीचे पत्रकार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.1985 साली त्यांनी
दहावी परिक्षा दिली त्यात ते उत्तीर्ण झाले परंतु परिस्थिती प्रतिकुल असल्याने काही
कारणास्तव त्यांना पुढील शिक्षण घेता आलं नाही.असे असताना त्यांनी जिद्द मात्र सोडली
नाही अन पुन्हा नुकताच झालेल्या 12 वी परिक्षेत त्यांनी परिक्षा दिली.2025 चा ऑनलाईन
निकाल लागला त्या निकालात प्रकाश जाधव हे उत्तीर्ण झाले.यश संपादन केल्याच्या आनंदाने
त्यांच्या 92 वर्षाच्या मातोश्री यांनी आपल्या 58 वर्षाच्या मुलाला पेढे भरवून शुभेच्छा
दिल्या असून सदरचा आनंद आईंना गगनात मावेनासे झाले असल्याचे यावेळी दिसून आले.यावेळी
पत्रकार प्रकाश जाधव यांनी आपल्या प्रतिक्रियेत असे म्हंटले की आत्मविश्वास दृढ असेल
तर वयाची मर्यादा गरजेची नसते,आणि मर्यादा ओलांडली कि विजय आपलाच असतो हे या यशातून
सर्वांना विचार पटवून देणारा एक प्रयत्नच आहे जो मी त्यांच्या नव्या विचारात भर म्हणून
आणून दिला.यावेळी पत्रकार प्रकाश जाधव हे 12 वी परिक्षेत उत्तीर्ण झाल्याने प्रशासकीय,राजकीय,पत्रकारिता,सामाजिक,शैक्षणिक
क्षेत्रातील सर्वच मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देत त्यांचे
कौतुक केले आहे.
Post a Comment