BIG BREAKING NEWS...

मुरबाडकरांच्या पाण्यासाठी मोठा डॅम तयार करण्याचा माझा संकल्प - आमदार किसन कथोरे

दि,13,POL, कुणाल शेलार,मुरबाड -

महाराष्ट्राचे लाडके तसेच मुरबाड विधानसभेचे आमदार किसनराव कथोरे यांच्या शुभहस्ते काल मुरबाड येथिल बागेश्‍वरी तलावाच्या सुशोभिकरण संवर्धन कामाचे भूमिपुजन सोहळा पार पडला.महाराष्ट्र राज्य शासन सरोवर संवर्धन योजेनेंतर्गत मुरबाड नगरपंचायत हद्दीतील बागेश्‍वरी तलाव सुशोभिकरण आणि संवर्धन फेज 2 मध्ये 5 कोटी रूपयाच्या कामाचे भूमिपुजन करण्यात आले.

मुरबाड शहराला बागेश्‍वरी तलावाचे पाणी पुरवठा होत असल्याने तलावाचे सुशोभिकरण व संवर्धन कामाकरिता अंदाजित खर्च 4 कोटी 99 लाख 68 हजार 398 रूपयाचे असून यामध्ये प्रामुख्याने तलावातील गाळ काढणे,पाथ वे,रेलिंग,सोलर लाट,धरण स्टोन पिचिंग,लिकेज बंद करणे,बसण्याकरिता बाक,गॅबियन स्ट्रक्चर यांचा समावेश आहे.यावेळी आमदार किसन कथोरे यांनी आपल्या मनोगतात असे म्हंटले की,फेज 2 चे काम प्रगतीपथावर असून लवकरच तिसर्‍या टप्प्याचे कामही करण्यात येणार आहे.

एक चांगल्या दृष्टिकोनातुन आपण हे काम करित असून पाणी साठा वाढविण्यासाठी उपयोग पिण्याच्या पाण्यासाठी व पर्यटनासाठी 55 एकर इतकी जागेचा उपयोग म्हणून मुरबाडच्या भविष्यासाठी जलसंपदा विभागाकडून सिमेंट काँक्रेटीकरणाचा उंच बांध घालून पिण्याच्या पाण्यासाठी मोठा डॅम तयार करण्याचा माझा संकल्प आहे त्यामुळे पाणी साठा वाढेल आणि निश्‍चितच पाणीटंचावर भविष्यात मात करता येणार आहे.

या भूमिपुजन सोहळयाला भाजपाचे जिल्हासरचिटणीस नितीन मोहपे सर,ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजेश पाटील,भाजपाचे मुरबाड तालुकाध्यक्ष दिपक पवार,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश बांगर सर,मा.सभापती दत्तुभाऊ वाघ,पं.स.मा.सदस्य अनिल घरत,मुरबाड नगरपंचायतीचे अभियंता परेश पवार,मुरबाड नगरपंचायतीचे मा.नगराध्यक्ष किसन अनंत कथोरे,मोहन सासे,मुकेश विशे,उपनगराध्यक्षा तथा विद्दयमान नगरसेविका सौ.मानसीता देसले,नगरसेविका सौ.मधुराताई सासे,अ‍ॅड.सचिन चौधरी,जयवंत कराळे सर,सुधिरभा तेलवणे,रिपाइंचे मुरबाड तालुकाध्यक्ष दिनेश उघडे,युवा नेतृत्व कार्यकर्ते मनोज रमेश देसले,अतुल देशमुख,सागर सुरेश कार्ले यांसह अन्य कार्यकर्ते नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. 

Post a Comment

Previous Post Next Post