BIG BREAKING NEWS...

आपला कार्यकर्ता पैशावाला नाही,स्वाभिमानी आहे - आमदार किसन कथोरे

 

दि,20,POL,कुणाल शेलार,मुरबाड -

आज केंद्रातील भाजप सरकारला अर्थात मोदी सरकारला 11 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मुरबाड मध्ये भाजपाच्या वतीने आमदार किसन कथोरे यांच्या कस्तुरी निवासस्थानी संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये व्यासपिठावरील मान्यवरांनी आपले मनोगत मांडले.यावेळी आमदार श्री.कथोरे यांनी संकल्प सभेतून केलेल्या विकासाबद्दल कार्यकर्ता यांच्याशी संवाद साधले.यामध्ये मुरबाड विधानसभेतील विकासाची झालेली रचना सबका साथ सबका विकास या ब्रीद वाक्याने 2047 ला भारत महासत्ता होण्याकरिता उज्ज्वल असे पाऊल टाकत आहे.आमदार श्री.कथोरे यांनी मुरबाड तालुक्यात सर्वच गरिब घटकांतील गरजूंना मागाल तेवढी घरं देऊन एकुण 17,500 घरकूल मंजूर झाली असल्याचे सांगत कोणाचं घर रद्द व्हावं यासाठी न भांडता कोणाचं घर बसावं यासाठी प्रयत्न करा असा मोलाचा सल्ला दिला.केंद्र सरकारच्या या घरकूल योजनेत राज्य सरकारने 50 हजार रूपये वाढीव देण्याचे ठरविले असून 2 लाखाच्या पुढे आता घरकूल रक्कम लाभार्थीला मिळणार आहे.आज यामध्ये कोणी पैसे घेऊन दलाली करत असेल तर मला सांगा मी काय ते बघतो परंतु कोणाच्या खोटया आमिषाला बळी पडू नका असे म्हणत आज हे शक्य झालं ते मोदी साहेब,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुती मुळे त्यामुळे हे ठामपणे सांगण्याची ताकद तुमच्यामध्ये असायला हवी असे मार्गदर्शन यावेळी केले.यावेळी आमदार श्री.कथोरे यांनी काहींचा समाचार घेत कोणी जिल्हापरिषदेला येल एखादा आणि म्हणेल ते मी केलं त्याला तुम्ही सांगायचं की तुझा बाबा नव्हता आमचा बाबा होता.आमची इच्छा अशी आहे की कार्यकर्ता तयार झाला पाहिजे.विकासाच्या बरोबर संघटना महत्वाची आहे,ज्याला पक्षाचे काम करायचे आहे त्यानी स्वाभिमानाने यावं पक्षाचं काम करावं,एखादा येल आणि म्हणेल माझा गट वेगळा हे खपवून घेतले जाणार नाही,वार्डात लाखो रूपये दिले आणि गद्दारी केली अशा गद्दारांना पक्षात थारा नाही कारण भाजपा मोदी साहेबांच्या पारदर्शक विचाराने चालली आहे. " सुसंगती सदा घडो,संगत बिघडवू नका नाहीतर पंगत बिघडेल " असे म्हणून कार्यकर्त्यांना मोलाचे मागदर्शन केले.यावेळी राष्ट्रवादी,आरपीआय यांनी आपल्यासोबत काम चांगलं केलं त्यामुळे आम्ही देखील प्रामाणिक राहू असे आश्‍वासन देत खरेदी विक्री संघात न्याय दिला आहे.आपला कार्यकर्ता पैशावाला नाही पण स्वाभिमानी आहे.पैशाच्या जोरावर राजकारण नाही प्रेमाच्या खातीर एकमेकांशी जोडले जातात त्यामुळे खर्‍या अर्थाने मोदी साहेबांनी गेल्या 11 वर्षात केलेला विकास हे सोपं नाही पुर्वीचा विकास दिशाहीन होता आणि आत्ताचा विकास योग्य दिशा दाखविणारा आहे.

त्यामुळे 11 वर्षात केलेल्या कार्याचा चांगला संकल्प म्हणून संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले असून मुरबाड तालुका खरेदी विक्री संघावर नुकताच प्रशासकीय संचालक मंडळ नेमण्यात आले असून अध्यक्ष म्हणून संतोष पवार यांची निवड करण्यात आले आहे यावेळी सर्व नियुक्त संचालक मंडळाचेही आमदार किसन कथोरे व भाजपा ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार सोहळा पार पडला.यावेळी श्री.डाकी यांनी भाजपाचे गेल्या 11 वर्षात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा आपल्या संभाषणातुन मांडून कार्यकर्ते यांना त्यांच्या पुढील कार्यात आपण सोबत असल्याने उस्फुर्त असा प्रतिसाद दिला.आमदार श्री.कथोरे यांनी केंद्र व राज्य सरकारने सर्व सामान्यांसाठी विविध योजना आणून त्याचा लाभ मिळवून दिला असल्याचे आपल्या मार्गदर्शनातुन मांडून मुरबाड तालुका विकासाने मोठया प्रगती पथावर आहे,गोवेली येथे गोडाऊन हब,सरळगाव एमआयडीसी,बदलापूर ते लातूर नवे महामार्ग,माळशेज घाटातील स्कायवॉक यांसह बारवी धरणग्रस्तांसारखे काळू धरणग्रस्तांचे पुनर्वसन बाबत मुख्यमंत्री यांच्याशी केलेली चर्चा व घेतलेली प्रखट भूमिका तसेच विविध ऐतिहासिक मुद्दयांसह संगमेश्‍वर तिर्थ क्षेत्राचे नवे लूक म्हणून 75 कोटी रूपये अंदाजे खर्च असून 18 कोटीचे टेंडर निघाले आहे.यामध्ये ज्यांनी देवाच्या नावाने जे राजकारण करण्याचा मनसुब प्रकार केला आहे त्यांचा समाचार घेतला जाल. " ये तो कुछ झाकी और बहोत कुछ बाकी "असल्याचा मार्मिक टोलाही विरोधकांना बसविला आहे.भिवंडीच्या कानाकोपर्‍यात मी फिरायला सुरूवात केली असून शहापूर सुध्दा मी पिंजून काढायला सुरूवात करणार आहे.मुरबाडचा आशिर्वाद असल्याशिवाय 3 नंबरचा 1 नंबर होणार नाही.माझ्याकडुन नेहमी 5 ते 10 कोटी कामांची यादी जाते.मुरबाडलाच निधी देतो असा नाही तर सगळीकडेच मी निधी देतोय त्यामुळे बीन पैशात चहा पाजून देतोय असेही आपल्या संभाषणात म्हंटले आहे.शेतकर्‍यांचे या अगोदरच्या खरेदी विक्री संघाने पैसे दिले नव्हते आपली सत्ता जशी आली तेव्हा पहिल्याच कॅबीनेट मिटींगमध्ये या प्रश्‍नाला हिरवा कंदील मिळाला आणि आज शेतकर्‍यांचे पैसे पहिल्याच टप्प्यात आले असून त्यांना मिळू लागले हा सिंहाचा वाटा या नव्या खरेदी विक्री संघाच्या संचालकांचा आहे.बोनस देतांना व्यापार्‍यांना बोनस द्दयायचा नाही,शेतकर्‍यांनाच तो मिळाला पाहिजे आणि जर असे केले तर तुम्ही माझ्या पक्षाचे असले तरी मी माफ करणार नाही असा सज्जडही आमदार श्री.कथोरे यांनी यावेळी दिला आहे.यावेळी सभेमध्ये उल्हासभाऊ बांगर,भाजपा मंडळाध्यक्ष दिपक पवार,जितेंद्र भावार्थे तसेच मुरबाड तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष संतोष बांगर यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.या संकल्प सभेला मुरबाड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे,भाजपा ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष जितेंद्र डाकी,राष्ट्रवादीचे चंद्रकांत बोस्टे,रिपाचे दिनेश उघडे,श्री.घोलप सर,भाजपाचे उल्हासभाऊ बांगर,भा तेलवणे,जयवंत कराळे सर,सुरेश बांगर सर,सुहास मोरे,अनिल घरत,मा.नगराध्यक्ष मोहन सासे,मुकेश विशे,अ‍ॅड.सचिन चौधरी,समाजसेवक मनोज देसले,मुरबाड तालुका खरेदी विक्री संघ अध्यक्ष संतोष पवार,श्री.साबळे यांसह मोठया संख्येने भाजपाचे पदाधिकारी,मा.पंचायत समिती सदस्य,सरपंच,महिला आघाडी तसेच कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post