BIG BREAKING NEWS...

घाणीचे साम्राज्यविरोधात मनसे आक्रमक ; उपाययोजना न केल्यास 15 ऑगस्ट रोजी नगरपांचायतीच्या कार्यालयासमोर कचरा आणून टाकू

 

दि,31,POL,कुणाल शेलार,मुरबाड -

मुरबाड नगरपंचायतीच्या हद्दीत मुरबाड म्हसा रोड ते बोकड आळी रस्त्याच्या दरम्यान घाणीचे साम्राज्य तयार झाले असून नगरपंचायतीचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.त्यामुळे तेथून येणार्‍या जाणार्‍या नागरिकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे यामुळे अनेक रोगरा पसरण्याची शक्यता असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण दिसून येत आहे.त्यामुळे सदर महत्वपुर्ण विषयाकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुरबाड तालुका सचिव रूपेश तुकाराम खाटेघरे यांनी लक्ष वेधून मुरबाड नगरपंचायतीला दि.30/07/2025 रोजी निवेदन देऊन एका आठवडयात उपाययोजना करून नागरिकांना मोकळा श्‍वास देण्यासाठी सहकार्य करावे असे निवेदनात नमूद आहे.एका आठवडयात घाणीचे साम्राज्य न हटविल्यास तालुका सचिव रूपेश खाटेघरे हे स्वःखर्चाने कचरा उचलून मुरबाड नगरपंचायतीच्या कार्यालयासमोर टाकतील असा आगळा वेगळा इशाराच मनसे स्टालने दिला आहे.त्यामुळे मुरबाड नगरपंचायत याकडे लक्ष वेधेल की सदरचा कचरा आपल्या कार्यालयात येण्याची वाट पाहिल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.सदर निवेदन देतांना मनसेचे मुरबाड तालुका सचिव रूपेश खाटेघरे,आकाश दळवी यांच्यासह अन्य मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post