BIG BREAKING NEWS...

इएसआयसी रूग्णांना गोळया नसल्याने मुरबाड ग्रामीण रूग्णालयाकडे प्रस्तान ; इएसआयसी हॉस्पिटलची चौकशी करावी....

 

दि,29,POL,कुणाल शेलार,मुरबाड -

मुरबाड शहरातील इएसआयसी प्राप्त हॉस्पिटल येथे इएसआयसी रूग्ण उपचार घेण्यासाठी गेले असता त्यांना आपल्या ब्लड प्रेशर आजारावर गोळया उपलब्ध नसल्याचे एका रूग्णांनी आमच्याशी बोलतांना सांगितले. इएसआयसी प्राप्त करून घेतलेल्या हॉस्पिटलची चौकशी व्हावी यासंदर्भात पत्रकारानी सबंधीत अधिकारी यांना पत्र दिले असुन त्यावर नेमकी काय खुलासा येतो हे पाहणे आहे.त्याचबरोबर आज मुरबाड ग्रामीण रूग्णालयात एका इएसआयसी रूग्णानी स्वतःचे इएसआयसी पॉलीसी असताना येऊन उपचार घेतले आहे त्यामध्ये त्यानी आपल्याला ब्लड प्रेशर असल्याने त्याच्या गोळया इएसआयसी अंतर्गत असलेल्या हॉस्पिटलच्या मेडिकलमध्ये नसल्याने धक्कादायक बाब समोर आली आहे.तेथे गेल्यावर त्याच्यावर तपासणी झाली परंतु गोळया उपलब्ध नसल्याने खाजगी मेडिकलमध्ये न परवडता ग्रामीण रूग्णालयात धाव घेतल्याने सदर अनागोंदी कारभार उघड झाला आहे.याबाबत सविस्तर माहिती घेतली असता गेल्या 1 महिण्यापासून इएसआयसी रूग्ण ग्रामीण रूग्णालयातून बीपीच्या गोळया घेऊन जात असल्याचे कळून आले त्यामुळे ग्रामीण रूग्णालयामध्ये सर्वसामान्य नागरिकांकरिता जे बीपीच्या गोळया असतात ते इएसआयसी रूग्णांना दिले जाते त्यामुळे इएसआयसीच्य खाजगी हॉपिस्टल आपली कमा करत असल्याने गोळयांचा भार ग्रामीण हॉस्पिटलवर पडतो.मग इएसआयसी हॉस्पिटलच्या मेडिकलमध्ये कोणत्या गोळया उपलब्ध आहेत,आणि बीपीच्या गोळया का उपलब्ध नाहित,त्यातच त्यांच्यावरील उपचाराचा किती खर्च बील लावण्यात आले आहे याची चौकशी करण्यासाठी 2 दिवसांत पत्रव्यवहार करण्यात येणार आहे.इएसआयसी खाजगी हॉस्पिटलमध्ये आणि गोळया घेतात शासकीय रूग्णालयामधून.याकडे थेट आता पत्रकारानी लक्ष वेधले असून 7 कोटीचा घोळ झाला होता तोच हॉस्पिटल पुन्हा घोळ करण्यासाठी सक्रिय झाला नाही ना असा संशय व्यक्त केला जात असून लवकरच यावर पत्रव्यवहार करण्यात आल्याने संबंधित खाजगी हॉस्पिटलसह डॉक्टराचे लायसन्स रद्द करणार असल्याचे आज या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे. इएसआयसी म्हणजे भ्रष्टाचार नव्हे यावर कालचे मागचे सर्व हातखंडे भ्रष्टाचार केले असल्याने त्याची चौकशी थेट सीबीआय यांच्याकडे करण्यात यावी असे लेखी निवेदन तक्रारदार येत्या 5 ते 6 दिवसांत करणार आहे. इएसआयसी त्या हॉस्पिटलच्या भ्रष्टाचाराची चौकशी 15 दिवसांत न केल्यास पत्रान्वये थेट मुख्यमंत्री यांच्या दालनात आमरण उपोषण छेडला जाल असा इशाराही या माध्यमातून दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post