BIG BREAKING NEWS...

ठाणे जिल्हाधिकारी म्हणुन डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची नियुक्ती...

 

दि,31,POL,कुणाल शेलार,मुरबाड -

नवनिर्वाचित ठाणे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ हे 2016 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून जालना येथे जिल्हाधिकारीपदी नियुक्ती होण्याआधी त्यांनी यवतमाळ येथे जिल्हा परिषदेचे सिओ म्हणून कामकाज पाहिले.त्यांच्या कार्याची दखल शासनानी घेऊन त्यांची कार्यशैली पाहून त्यांचे कौतुकही केले होते.जिल्हयाचा विकास तळागळात कसा करावा याचा त्यांना दांडगा अनुभव असल्याने त्यांना जालना येथे जिल्हाधिकारी म्हणून जिल्हयाचा विकासात्मक व जनतेची सेवा करण्याची संधी दिली.त्यानंतर त्यांनी जालना जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्विकारताच अवैध धंद्दयांना आळा घातला.प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी यांना माणूसकी झरीतून जनतेचे काम जलदगतीने करण्याच्या सुचना दिल्या.जिल्हयातील प्रशासकांमध्ये तेजोमय ज्योत निर्माण करून अनेक वेळा त्यांनी शासकीय कार्यालयात भेटी दिल्या.आरोग्य,शैक्षिणिक,क्रिडा क्षेत्रात शासनाच्या माध्यमातून प्राधान्य मिळवून देत सर्वसामान्य जनतेच्या पातळीवर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या प्रश्‍नाचे निरासरण केले.कायदा व सुव्यवस्था चोखपणे हाताळले असे धडाकेबाज आयएएस अधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची ठाणे जिल्हाधिकारी श्री.अशोक शिनगारे हे आज सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी ठाणे जिल्हाधिकारी म्हणून श्री.पांचाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सदर महाराष्ट्रात 5 बडया आयएएस अधिकारी यांच्या बदल्यांचा निर्णय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी रात्री उशिरापर्यंत घेतला.यामध्ये नवनिर्वाचित ठाणे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी लोकसभा निवडणूकीच्या काळात मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या उपोषण प्रशासनाचे काम हाताळलेले आहे.ठाणे जिल्हा भौगोलिक आणि लोकसंख्यांकी दृष्टिकोणातुन मोठा जिल्हा असून या अगोदर तत्कालीन जिल्हाधिकारी श्री.राजेश नार्वेकर तसेच सेवानिवृत्त होणारे विद्दयमान ठाणे जिल्हाधिकारी श्री.अशोक शिनगारे यांनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे.जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर असलेले तत्कालीन व सेवानिवृत्त होणारे विद्दयमान ठाणे जिल्हाधिकारी यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला असून जनतेसह प्रशासक अधिकारी यांच्या स्मरणात कायमच राहिला आहे.त्यात आता धडाडीचे नवनिर्वाचित ठाणे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची नियुक्ती करण्यात आल्याने ते देखील त्यांचा यवतमाळ व जालना जिल्हयात काम केलेल्या कार्यासारखा उमटवतील यात शंकाच नसून नवनिर्वाचित ठाणे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्या नियुक्तीने सर्व जनतेकडून त्यांचे हार्दिक स्वागत करण्यात येत असून ठाणे जिल्हाधिकारी श्री.पांचाळ आज आपला पदभार स्विकारणार आहेत.सेवानिवृत्त होणारे ठाणे जिल्हाधिकारी श्री.अशोक शिनगारे हे आज सेवानिवृत्त होत असून त्यांना व नवनिर्वाचित म्हणुन पदभार स्विकारणारे ठाणे जिल्हाधिकारी श्री.कृष्णनाथ पांचाळ यांना पुढील वाटचालीस ठाणे जिल्हयातून सर्वसामान्य जनतेकडून शुभेच्छा देण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post