दि,02,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
गेल्या काही दिवसांपूर्वी
मुरबाड माळशेज रोडवरील खाटेघर गावाजवळील एका झाडाखाली वरिष्ठ अधिकारी नसताना एका आरटीओ
अधिकारी यांनी मनमानी पध्दतीने झाडाच्या कोपर्या आढ लपून हेल्मेट तथा हायस्पीड म्हणून
ऑनलाईन दंड मारून ग्रामीण भागातील नागरिकांना मनस्ताप दिला आहे.यासंदर्भात आमची बातमी
प्रसिध्द होताच आरटीओ त्या झाडाखाली अद्दयापतरी दिसली नसुन लाडक्या बहिणींना देण्यासाठी
तिजोरीत पैसे नसल्याने त्यांच्या प्रत्येक पथकाला 20 ते 50 लाखाच्या दंड वसुलीचे टार्गेट
दिले असल्याची बातमी एका प्रसिध्द दैनिक वेबसाईटवर प्रसिध्दी झाली होती.अलीकडे सर्वच
अन्न खाद्दय वस्तुत वाढ झाली असून लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी तिजोरीत नसल्याने
विविध पध्दतीने वसुली करण्याचा मनसुब प्रकार सरकारचा असल्याची ओरड आता जनतेत होत आहे.नवर्याकडून
वसुली आणि मानलेल्या बहिणींना भाऊचे पैसे देऊन लाडकी बहिण योजना राबविली जात असल्याने
या वसुलीची मक्तेदारी आरटीओ यांच्या परडयात टार्गेट म्हणून टाकण्यात आली असल्याची शक्यता
आतातरी नाकारता येत नाही.कल्याण,मुरबाड माळशेज रोडवर ओव्हरलोड डंपर,वेगाने असलेले ओव्हरलोडनी
भरलेली बस,काल्यापिल्यात नियमापेक्षा जास्त प्रवासी,पोलीसांच्या खाजग्या वाहनांवरील
पोलीस म्हणून लावलेली पाटी,हायस्पीड फलक नसताना मनमानी पध्दतीने गैरपध्दतीने नियमबाहृय
पध्दतीने वाहनाला कॅमेरेत कैद करून आकारलेले बेकायदेशीर दंड,पोलीस विना हेल्मेट असताना
त्यांच्यावर कारवाई न करता कर्तव्यावर पत्रकारांना दुश्मन समजून त्यांच्यावर वर्दीचा
थोप आजमावणे,स्थानिक प्रवाशांच्या समस्या असताना त्यांच्या समस्या तक्रारीवर लक्ष वेधले
जात नसताना त्यांच्यावर असलेला मनस्ताप त्यात आरटीओ अधिकारी यांची मनमनी यामुळे येथिल
नागरिक प्रवासी वाहन चालक यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.कायदेशीर दंड 500 रू आकारणे
असेल तर दंड म्हणजे दंड असताना ऑनलाईन दंडामध्ये कॉन्व्होकेशन आणि जीएसटी एकत्रीत
मिळून आरटीओकडून वसुली केली जात असल्याने नेमकी हि फसवणूक किती मोठी केली जात आहे याचा
जनतेला बोध होऊ लागला आहे.
माळशेज
घाटातील झालेल्या प्रकारावेळी आरटीओ कुठे होती ? जर आरटीओ तेथे आपली कामगिरी आणि जबाबदारी
थाप सक्षमपणे दाखवित राहिली असती तर झालेला अनर्थ टळला असता परंतु आरटीओंची वसुली खाटेघर
जवळील एका झाडाखालील आपली स्कॉर्पिओ लावून करित असल्याने खरे तर त्या माळशेज घाटातील
झालेल्या अपघात प्रकरणार आरटीओ अधिकारी यांची चौकशी होणं अपेक्षित असताना वरिष्ठ अधिकारी
वर्ग मात्र मुक गिळून गप्प आहेत.यासंदर्भा बेकायदेशीर एक्सपायर असलेल्या गाडया सुसाट
असून त्यांच्यावर कडक कारवाई न करता,पोलीसांच्याच गाडया आयएनडी प्लेट नसल्याने त्यांचेवर
कारवाई न करता सर्वसामान्यावर आपली ताकद दाखविली जात असल्याने महाराष्ट्र राज्याचे
मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महोदय यांनी लक्ष वेधावे म्हणून पत्रकार व सामाजिक संघटना,नागरिकांनी
येत्या 8 दिवसांत मंत्रालयाच्या दालनासमोर आमरण उपोषणाचा इशारा देऊन आर के पार न्यायीक
लढा देण्याचा निर्णय घेतला आहे यासंदर्भात वरिष्ठांना पत्रव्यवहार करण्यात आला असून
पोलीस प्रशासनाचे खाजगी गाडयावर पोलीस नाव असल्याने सदरचे उपोषण थांबविण्यासाठी कितीही
नोटीसी पत्रव्यवहार केल्यास सदरचे उपोषण तीव्रपणे छेडण्यात येईल असा इशाराही या माध्यमातून
देण्यात येत आहे.
Post a Comment