दि,07,POL,वाशिंद -
येणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त
वाशिंद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व मांस विक्री करणाऱ्या दुकानदारांना समाजातील
धार्मिक भावना लक्षात घेऊन रविवार ६ जुलै रोजी (आषाढी एकादशी दिवशी) आपली दुकाने स्वयंस्फूर्तीने
बंद ठेवण्याचे आवाहन वाशीद पोलिसांकडून करण्यात आले आहे.सामाजिक सलोखा आणि धार्मिक
सौहार्द टिकवण्यासाठी पोलिसांचा हा उपक्रम अत्यंत सकारात्मक असून, विविध धर्मीय नागरिकांमध्ये
एकमेकांच्या श्रद्धेचा आदर आणि समजूतदारी वाढवण्याचे कार्य करतो आहे.सहाय्यक पोलीस
निरीक्षक पी.वाय.कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेल्या बैठकीत स्थानिक व्यापारी,मांस
विक्रेते व विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.सर्वांनी पोलीस प्रशासनाच्या
आवाहनाला प्रतिसाद देत आषाढी एकादशीच्या दिवशी मांस विक्री पूर्णपणे बंद ठेवण्याचे
आश्वासन दिले.
(पोलीस
प्रशासनाचे आवाहन "मांस विक्रेत्यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून आषाढी एकादशीच्या
दिवशी आपली दुकाने बंद ठेवावीत. ही बाब कोणत्याही जबरदस्तीने नव्हे,तर समाजात शांतता
आणि सौहार्द अबाधित राहावा यासाठी आहे." -पी वाय कादरी (सहाय्यक पोलीस निरीक्षक,वाशिंद
पोलीस स्टेशन)
Post a Comment